मराठवाड्यात ‘बोल्ट अरेस्टर’ न लावल्याने, वीज कोसळून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांत वाढ
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रात मंगळवारी पावसादरम्यान वीजा कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वीज कोसळून मृत्यू होण्याचे संकट वाढले आहे. मध्य महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्रात वीज कोसळून होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठी आहे. येथे वीजेचा अटकाव करणारी ‘बोल्ट अरेस्टर’ उपकरणे लावली नसल्याचे उघड झाले आहे. बोल्ट अरेस्टर मुळे वीज त्यास आकर्षित होते आणि संभाव्य हानी टळते.
साल २०२३ मध्ये वीज कोसळून ४८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर गेल्यावर्षी २८ प्रकरणे वाढली आणि एकूण ७६ लोकांचा मृत्यू झाला. मंगळवारी छत्रपती संभाजीनगरात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक आपात्कालिन व्यवस्थापन टीमची बैठक झाली यावेळी ही आकडेवारी समोर आली.
या संदर्भात आलेल्या अहवालात साल २०२४ च्या मान्सून पूर्व बैठक झाली. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात किमान १०० बोल्ट अरेस्टर उपकरणे बसविण्याचे आदेश दिले.परंतू एकाही जिल्ह्याने या उपकरणाच्या खरेदीसाठी प्रस्ताव पाठवला नाही.
लातूरात दोन वर्षांत 20 जणांचा मृत्यू
लातूर जिल्ह्यात 2023 मध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२४ मध्ये येथे १५ जणांचे प्राण गेले. त्यानंतरही या जिल्ह्यात केवळ ३ बोल्ट अरेस्टर उपकरणे आहेत. जालनात गेल्या वर्षी वीज कोसळून १२ जण ठार झाले होते. येथेही केवळ तीनच उपकरणे बसवली आहेत. असे असले तरी बिड जिल्हा मात्र अपवाद आहे. येथे ३०८ उपकरणे लावूनही १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठवाड्यात एकूण ४०३ बोल्ट अरेस्टर
परभणीत चार उपकरणे आहेत, मात्र सर्व खराब झाली आहेत. परभणीत २०२४ मध्ये १० लोक ठार झाले होते. मराठवाड्यात एकूण ४०३ बोल्ट अरेस्टर उपकरणे बसवली आहेत. अनुक्रमे छत्रपती संभाजीनगरात ७५, जालना ३, परभणी ४,हिंगोलीत २, नांदेडात ४, बीडमध्ये ३०८, लातूरात ३ आणि धाराशिवमध्ये ४ बोल्ट अरेस्टर बसवले आहेत.
तपासणी करू आणि निर्णय घेऊ
ज्या भागात ‘बोल्ट अरेस्टर’ बसवले आहेत त्या भागातील आकडेवारी तपासण्याचे आदेश आपण सर्व जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. त्यांनी मला आणखी ‘बोल्ट अरेस्टर’ खरेदी करण्याचा कोणताही प्रस्ताव पाठवला नाही आणि आम्ही जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अहवालाची तपासणी करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ असे आयुक्त दिलीप गावडे यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List