अखेर रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
‘लय भारी’ फेम अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या चाहत्यांना नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे. रितेश गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटावर काम करत होता. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता ठरली आहे. रितेशने या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यामुळेच रितेशचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक असलेले दिसून येत होते. परंतु आता ही उत्कंठा संपली आहे. रितेशने या चित्रपटाची तारीख जाहीर केल्याने प्रतिक्षा संपली असून आता चित्रपट कधी एकदा पडद्यावर पाहायला मिळतोय याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट रितेशसाठी खूप महत्त्वाचा चित्रपट असून, त्याने काही वर्षांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती. रितेशच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या नावासाठी एक विशेष लोगो बनवून हवा होता. राजा शिवाजी हा चित्रपट सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 रोजी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 6 विविध भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. यामध्ये मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांचा समावेश आहे. देशभरातील विविध राज्यातील चाहत्यांना त्यांच्या भाषेत सिनेमाची कथा आणि गौरवशाली इतिहास पाहण्याचा आनंद मिळणार आहे.
राजा शिवाजी या चित्रपटासाठी रितेशने खूप मेहनत घेतली आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट त्याच्या करिअरमधील एक महत्त्वाचा चित्रपट असल्याचे त्याने अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकसाठी रितेशने जवळपास एक वर्षाहून अधिक काळ मेहनत घेतलेली असल्यामुळे, राजा शिवाजी मध्ये रितेश छत्रपतींच्या भूमिकेत कसा दिसतो हे पाहणे त्याच्या फॅन्ससाठी अनोखी पर्वणी असणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List