नागपूरमधून बेपत्ता झालेली महिला पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात, लडाख पोलिसांची माहिती
नागपूरमधली एक महिला पाकिस्तामधील एका व्यक्तीशी संपर्कात होती अशी माहिती लडाख पोलिसांनी दिली आहे. तसेच ही महिला सीमा पार करून पाकिस्तानमध्ये पोहोचली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नागपूरमध्ये राहणारी सुनीता ही महिला आपल्या 12 वर्षांच्या मुलासोबत बेपत्ता झाली होती. याबाबत सुनीता यांचा भाऊ सुनील जमगाडे यांनी पोलिसांत तक्रार केली होती. सुनीता ही लडाखच्या एलओसीजवळ दिसली होती. त्यानंतर ती तिथून बेपत्ता झाली. सुनीता आपल्या 12 वर्षाचा मुलासोबत तिथपर्यंत आली होती. पण सीमेवजवळच्या गावातच आपल्याला मुलाला सोडून सुनीता निघून गेली.
सुनीताचे कॉल रेकॉर्डिंग तपासल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. सुनीता पाकिस्तानी नागरिक असलेल्या व्यक्तीसोबत संपर्कात होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनीता पाकिस्तानमध्ये पोहोचली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच सुनीताच्या मुलाला बाल संगोपन समितीने ताब्यात घेतले असून त्याची देखभाल सुरू आहे.
सुनीता ही नागपूरमध्ये नर्स म्हणून काम करत होती. गेल्या काही दिवसांपासून ती व्यथित होती असेही तपासात समोर आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List