मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास महागणार, 26 मेपासून तिकीट दरात 25 रुपयांची वाढ
मोरा भाऊचा धक्का सागरी प्रवासासाठी आता जादा 25 रुपये मोजावे लागणार आहेत. 26 मेपासून पावसाळी हंगामासाठी या मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दर 80 रुपयांवरून 105 रुपयांपर्यंत महागणार आहे. नोकरी, व्यवसाय तसेच मुंबई, रायगडात पर्यटनासाठी येणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात भरमसाट वाढ केली जाते. यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीट दरात 80 रुपयांवरून थेट 105 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हाफ तिकीट दरातही लाक्षणीक महणजे 39 रुपयांवरून 52.50 रुपयांपर्यंत म्हणजे 13.50 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. ही पावसाळी हंगामासाठी तिकीट दरवाढ 26 मेपासूनच 31 ऑगस्टपर्यंत लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली. पावसाळी हंगामासाठी या तिकीट दरवाढीची मंजुरी मेरिटाईम बोर्डाकडून याआधीच घेण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली.
सोयीसुविधांचा पत्ताच नाही
सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीट दरात 80 रुपयांवरून थेट 105 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हाफ तिकीट दरातही लाक्षणीक महणजे 39 रुपयांवरून 52.50 रुपयांपर्यंत म्हणजे 13.50 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. ही पावसाळी हंगामासाठी तिकीट दरवाढ 26 मेपासूनच 31 ऑगस्टपर्यंत लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली. पावसाळी हंगामासाठी या तिकीट दरवाढीची मंजुरी मेरिटाईम बोर्डाकडून याआधीच घेण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली.
मोरा-भाऊचा धक्का हा सागरी मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत फायदेशीर, सुखद आणि शार्टकट म्हणून ओळखला जातो. वाहतूककोंडीची दगदग नसल्याने या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याशिवाय दरवर्षी पावसाळी हंगामात गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग, भाऊचा धक्का ते रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्यात येते. त्यामुळे मांडवा-अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावर गर्दी वाढते. मात्र तिकीट दरवाढीनंतरही प्रवाशांच्या सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. उलट प्रवाशांच्या नशिबात गळक्या प्रवासी बोटी आणि समस्यांचाच अधिक सामना करावा लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List