स्पेनमध्ये इंटरनेट ठप्प, कॉलही जात नाही
स्पेनमध्ये पुन्हा एकदा मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. चार आठवडय़ांपूर्वी ब्लॅकआऊट झाल्यानंतर आता सर्व प्रमुख मोबाईल नेटवर्क ठप्प झाली आहेत. देशातील सर्वात मोठय़ा मोबाईल नेटवर्क कंपन्या मोविस्टार, ऑरेंज, व्होडाफोन, डिजिमोबील आणि ओटूची सेवा ठप्प झाली आहे.
स्पेनमधील माद्रिद, बार्सिलोना, मलागा, वालेंसिया, मर्सिया, सेविले, बिलबाओ या प्रमुख शहरांतील फोनमध्ये सिग्नल येत नाही. इंटरनेट चालत नाही, कॉलही लागत नाही. यासह आपत्कालीन सेवा 112 सुद्धा काम करत नाही. दुर्घटना, आग आणि वैद्यकीय सेवा त्यामुळे खोळंबली आहे. आपत्कालीन 112 सेवा ठप्प पडल्याने लोकांच्या मदतीसाठी तात्पुरते दुसरे नंबर जारी केले आहेत. काही आठवडय़ांपूर्वी स्पेन व पोर्तुगालमध्ये वीज कपातीनंतर मेट्रो आणि रेल्वे सेवा कोलमडली होती. ट्रफिक लाइट बंद पडली होती. एटीएम, टेलिफोन लाइन काम करत नव्हती. याचा फटका जवळपास 50 मिलियन लोकांना बसला होता. महिनाभरात दुसऱ्यांदा स्पेनमध्ये अशी परिस्थिती उद्भवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List