माझं पाकिस्तानात लग्न लावून द्या, ज्योती मल्होत्राची ISI अधिकाऱ्याकडे मागणी
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी आज संपणार आहे. ज्योतीशी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाब समोर आल्या आहेत. ज्योती पाकिस्तानच्या अनेक अधिकाऱ्यांशी संपर्कात होती आणि त्यांच्यांशी संधान सांधून तिने अनेक देशविरोधी कारवायात सहभागी घेतल्याची कबुली दिली आहे. इतकंच नाही तर आपले पाकिस्तानात लग्न लावून द्या अशी विनंतीही तिने एका आयआसआयच्या अधिकाऱ्याकडे केल्याचे समोर आली आहे. ज्योती मल्होत्राचे चार बँक अकाऊंट्स होते, पोलीस या खात्यांची तपास करत आहेत.
ज्योती मल्होत्राचे ट्रॅव्हल विथ जो नावाचे युट्युब चॅनेल आहे, तिच्याकडे पाकिस्तानचा अधिकृत विसाही आहे. 2023 साली पाकिस्तान फिरण्यासाठी विसासाठी ती दिल्लीच्या पाकिस्तान वकिलातमध्ये गेली होती. तेव्हा तिची ओळख अहसान उर रहीन उर्फ दानिशसोबत झाली होती. त्यानंतर दानिशसोबत तिची ओळख वाढली. ज्योती आतापर्यंत दोन वेळा पाकिस्तानात गेल्याचे तिने सांगितले. पाकिस्तानात दानिशच्या सांगण्यावरून तिने अली हसन नावाच्या व्यक्तीची भेट घेतली. अली हसननेच तिची पाकिस्तानमध्ये फिरण्याची आणि राहण्याची सोय केली होती. अली हसननेच तिची ISI अधिकारी शाकिर आणि राणा शहबाजची भेट घालून दिली.
धक्कादाय बाब म्हणजे कुणाला संशय येऊ नये म्हणून ज्योतीने शाकिरचा नंबर मोबाईलमध्ये जट रंधावा नावाने सेव्ह केला होता. हिंदुस्थानात परतल्यानंतर ज्योती व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्कात होती आणि देशाच्या संबंधित संवेदनशील माहिती त्यांना देत होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List