ओला-उबर कॅब रद्द केली तर प्रवाशासह चालकालाही दंड; राज्य सरकारचा नवा निर्णय

ओला-उबर कॅब रद्द केली तर प्रवाशासह चालकालाही दंड; राज्य सरकारचा नवा निर्णय

मुंबईत ओला-उबरसारख्या अ‍ॅग्रिगेटर कॅब सेवांसाठी राज्य सरकारने मंगळवारी नवा शासकीय आदेश (GR) जाहीर केला. या धोरणात चालक आणि प्रवासी दोघांनीही ट्रिप रद्द केल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही धोरणे लागू करण्यात आली आहेत. जीआरनुसार, “चालकाने बुकिंग अ‍ॅपवर स्वीकारल्यानंतर ते रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये (जे कमी असेल) इतका दंड आकारला जाईल. हा दंड प्रवाशाच्या खात्यात जमा होईल. प्रवाशाने कारणाशिवाय बुकिंग केल्यानंतर ट्रिप रद्द केल्यास, एकूण भाड्याच्या 5% किंवा 50 रुपये (जे कमी असेल) दंड आकारून तो चालकाच्या खात्यात जमा केला जाईल.”

ओला, उबर किंवा रॅपिडोसारख्या ॲप आधारित कॅब सेवा वापरणाऱ्या प्रत्येकासाठी राईड रद्द होणं ही एक त्रासदायक बाब ठरली होती. कोणत्याही कारणास्तव ड्राइव्हरने राईड रद्द केल्यास ग्राहकाला यासाठी दंड भरावा लागायचा. कंपनी कोणतीही असो, ही समस्या सर्वत्र होती. परंतु आता या नव्या धोरणानुसार ड्राइव्हरने राईड रद्द केली तर त्यालाही दंड भरावा लागेल आणि दंडाची रक्कम थेट ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाईल.

यामध्ये दररोजच्या प्रवासासाठी किमान आणि कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. किमान प्रवास अंतर 3 किमी तर, कमी मागणीच्या काळात 25% पर्यंत सवलत आणि जास्त मागणीच्या वेळेस भाडं बेस रेटच्या 1.5 पटापर्यंत वाढू शकतं. चालकांना किमान 80% भाडं मिळावं, अशी अट आहे. याशिवाय अ‍ॅप आणि वेबसाइटसाठी सुरक्षा मानकं, रिअल-टाइम जीपीएस ट्रॅकिंग, इमर्जन्सी नंबर, चालकाचा पार्श्वभूमी तपासणी आणि प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आलं आहे. चालक आणि प्रवाशांसाठी विमा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर प्रोत्साहित केला जाणार आहे.

प्रवाशांना आणि चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचं त्वरित निराकारण करण्यासाठी एक यंत्रणा असायला हवी, असंही या जीआरमध्ये म्हटलंय. महाराष्ट्रातील ॲप-आधारित वाहनांसाठी सुरक्षा मानकं पूर्ण करणारं ॲप किंवा वेबसाइट असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे चालक आणि प्रवाशांसाठी विमा उपलब्ध असावा, असंही त्यात नमूद केलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather Update : महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट; उरले फक्त काही तास, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट IMD Weather Update : महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट; उरले फक्त काही तास, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्राला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय
११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ब्रेक, पहिल्याच दिवशी वेबसाईट हँग, लाखो विद्यार्थी – पालकांना मन:स्ताप
ईद नाही तर, या दिवशी प्रदर्शित होणार शाहरुख खानचा ‘किंग’ चित्रपट
महिलांविरुद्ध अशी भाषा? अभिजित अय्यर-मित्र यांना कोर्टाचा खरमरीत सवाल, Newslaundry च्या विरोधातील पोस्ट हटविणार
फडणवीसांच्या सुलतानी सरकारमध्ये शेतकरी संकटात; शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू – हर्षवर्धन सपकाळ
अणुशास्त्रज्ञ डॉ. एम.आर. श्रीनिवासन यांचे निधन, वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास