उपकरप्राप्त इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटला गती मिळणार, म्हाडा टेंडर काढून झोननुसार कंपन्या नेमणार

उपकरप्राप्त इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटला गती मिळणार, म्हाडा टेंडर काढून झोननुसार कंपन्या नेमणार

वर्षानुवर्षे मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया म्हाडाकडून सुरू असून वर्षभरात 13 हजार 91 इमारतींचे ऑडिट करण्याचे प्राधिकरणाचे लक्ष्य आहे. या कामाला आणखी गती देण्यासाठी म्हाडा आता टेंडर काढून झोननुसार कंपन्यांची नियुक्ती करणार आहे.

मुंबईत सध्या 13 हजारहून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्या 80 ते 100 वर्षे जुन्या आहेत. या इमारतींची देखभाल आणि दुरूस्ती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून केली जाते. यातील काही इमारती दुरुस्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्विकास केल्यास इमारत कोसळण्याच्या घटना कमी होऊन जीवित व वित्तहानी रोखता येणे शक्य होईल. ही बाब लक्षात घेऊन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी वर्षभरात सर्व उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश फेब्रुवारीत दिले आहेत.

118 इमारती अतिधोकादायक 

म्हाडाने आतापर्यंत 600 हून अधिक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असून त्यापैकी 118 इमारती सी-1 म्हणजे अतिधोकादायक असल्याचे आढळले आहे. तसेच ज्या इमारतींना दुरुस्तीची आवश्यकता आहे त्यासाठी लवकरच म्हाडातर्फे टेंडर काढण्यात येणार आहे.

142 ऑडिटरवर जबाबदारी 

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट यापूर्वी पालिकेकडून  करण्यात येत होते. यंदाच्या वर्षीपासून म्हाडाच्या पॅनलकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. यासाठी म्हाडाकडे आता  142 ऑडिटर असून यात नव्याने नियुक्ती केलेल्या 26 ऑडिटरचा समावेश आहे. स्ट्रक्चरल ऑडिटला आणखी गती मिळावी यासाठी आम्ही आता टेंडर काढून झोननुसार कंपन्यांची नियुक्ती करणार आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तर या दोघांना भुजबळांची ‘मांडी’ खाजवावी लागणार, ‘सामना’तील मांडी पुराणातून महायुतीचे वाभाडे तर या दोघांना भुजबळांची ‘मांडी’ खाजवावी लागणार, ‘सामना’तील मांडी पुराणातून महायुतीचे वाभाडे
छगन भुजबळ यांची पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात एंट्री झाली. धनंजय मुंडे यांच्या रिक्त खात्यावर भुजबळांची वर्णी लागली. त्यांनी काल छोटेखानी कार्यक्रमात...
सचिन तेंडुलकरचा जावई असता हा अभिनेता, पण कुटुंबियांच्या भेटीनंतर मोडलं नातं
30 वर्षांनी मोठ्या सुपरस्टारसोबत अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स पाहून भडकले चाहते
भुईबावडा घाट असुरक्षितच! ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या स्थितीत; संरक्षण कठडे ढासळले
जम्मू कश्मिरमधील मशिदीची दुरुस्ती करण्यासाठी हिंदुस्थानी सैन्य सरसावले! पाकिस्तानच्या गोळीबारात स्थानिक मशिदीचे नुकसान
रेड्याने अडवली ‘मरे’ची वाट, तासाभरानंतर रेल्वे सेवा पूर्ववत
कल्याणच्या गांधारी पुलावर ट्रकची रिक्षाला धडक; महिला ठार, मुलगा गंभीर जखमी, चालक पोलिसांच्या ताब्यात