ग्राहक आयोगाचा अॅमेझॉनला दणका; राखीची ऑर्डर अचानक रद्द, 40 हजार भरपाई देण्याचे आदेश
ऑनलाईन दिलेली राखीची ऑर्डर अचानक रद्द केल्याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अॅमेझॉनला दणका दिला आहे. ग्राहकाला झालेल्या मनस्तापप्रकरणी आयोगाने अॅमेझॉनला 40 हजारांचा दंड ठोठावत भरपाई म्हणून ते पैसे ग्राहकाला देण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदाराने मोटू पटलू या कार्टूनची लहान मुलांसाठीची राखी 2 ऑगस्ट 2019 रोजी ऑनलाईन ऑर्डर केली होती. त्यासाठी तिने अॅमेझॉन कंपनीला 100 रुपये मोजले होते. 8 ते 13 ऑगस्ट 2019 दरम्यान ही राखी अॅमेझॉनकडून उपलब्ध होणार होती, मात्र 13 तारीख उलटली तरी राखी काही मिळाली नाही. उलट ऑर्डर रद्द करत कंपनीने 100 रुपये तक्रारदार ग्राहकाकडे ट्रान्सफर केले. झालेल्या मनस्तापाप्रकरणी ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करत दाद मागितली. याप्रकरणी आयोगाच्या अध्यक्षा समिंदरा सुर्वे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत अॅमेझॉनला दोषी ठरवले व 40 हजारांचा दंड ठोठावला तसेच ही रक्कम भरपाई म्हणून तक्रारदाराकडे दोन महिन्यांत सुपूर्द करण्याचे आदेश दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List