महिला डॉक्टरांशी असभ्य वर्तन; भाजप नेत्याला चोपले
महिला डॉक्टरांशी असभ्य वर्तन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ‘यूट्यूबर’ मनीष कश्यप यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कनिष्ठ डॉक्टरांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज घडली. मनीष कश्यप एका रुग्णाच्या वतीने तक्रार देण्यासाठी रुग्णालयात आले होते. त्यावेळी त्यांचा महिला डॉक्टरांशी वाद झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या कनिष्ठ डॉक्टरांनी कश्यप यांना मारहाण केल्याची घटना घडली.
कश्यप यांच्या समर्थकांनी मात्र रुग्णालयातील महिला डॉक्टरांशी कोणतेही गैरवर्तन करण्यात आले नसल्याचा दावा केला आहे. कारण नसताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. झटापटीत त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. मारहाणीनंतर त्यांना कोंडून ठेवण्यात आले. कश्यप यांनी लेखी माफी मागितल्यानंतर त्यांना सोडण्यात आले, असा दावा कश्यप यांच्या समर्थकांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List