‘अमंगल’वार! शेअर बाजार आपटला, कोरोनाच्या भीतीने विदेशी गुंतवणूकदाराने शेअर्स विकले

‘अमंगल’वार! शेअर बाजार आपटला, कोरोनाच्या भीतीने विदेशी गुंतवणूकदाराने शेअर्स विकले

हिंदुस्थानी शेअर बाजारात मंगळवारी घसरण पाहायला मिळाली. तिसऱ्या सत्रात जोरदार घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना जोरदार झटका बसला. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात शेअर्सची विक्री केल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 872 अंकांनी घसरून 81,186 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 261 अंकांनी घसरून 24,683 अंकांवर स्थिरावला.

ऑटो आणि फायनांशियलच्या शेअर्समध्ये मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. यामध्ये आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, सिपला आणि श्रीराम फायनान्सचे शेअर्स घसरले. फेडच्या राफेल बोस्टिकने 2025 मध्ये केवळ एकच व्याजदर कपात करण्याचे संकेत दिल्याने महागाईची चिंता वाढली. एफआयआयएसने 525.95 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. जपानी बॉण्डचा लिलाव कमजोर ठरला, हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वार्ता अनिश्चित, जागतिक व्यापारावर तणाव, रुपयांत घसरण आणि हाँगकाँग व सिंगापूरमध्ये कोविडचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्व कारणांमुळे आज शेअर बाजारात घसरण झाल्याचे जाणकारांचे मत आहे.

5.35 लाख कोटी स्वाहा

बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन मंगळवारी 438.32 लाख कोटी रुपयांवर आले. सोमवारी ते 443.67 लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.35 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

झोमॅटोला जोरदार झटका

निफ्टी आणि इंडेक्समध्ये सर्वात जास्त घसरण झाली. सेन्सेक्सच्या 30 पैकी 26 शेअर्समध्ये घसरण. झोमॅटोचे शेअर्स 4.24 टक्क्यांच्या घसरणीसह 227.90 रुपयांपर्यंत खाली आले. मारुती, एमअँडएम, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि पॉवर ग्रीडमध्ये मोठी घसरण झाली आहे. टाटा स्टील, इंडसइंड बँक, आयटीसी आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्येही घसरण झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओला-उबर कॅब रद्द केली तर प्रवाशासह चालकालाही दंड; राज्य सरकारचा नवा निर्णय ओला-उबर कॅब रद्द केली तर प्रवाशासह चालकालाही दंड; राज्य सरकारचा नवा निर्णय
मुंबईत ओला-उबरसारख्या अ‍ॅग्रिगेटर कॅब सेवांसाठी राज्य सरकारने मंगळवारी नवा शासकीय आदेश (GR) जाहीर केला. या धोरणात चालक आणि प्रवासी दोघांनीही...
पर्सनल कामं उरकून घ्या, आठ दिवस पावसाचं धुमशान, हवामान खात्याचा मुंबईसाठी इशारा काय?
महिला – पुरुषांमधील संबंध म्हणजे जगाचा नियम आणि…, अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
लष्करचा सह-संस्थापक अमीर हमजा अपघातात गंभीर जखमी, लाहोरच्या रुग्णालयात मोजतोय अखेरच्या घटका
स्पेनमध्ये इंटरनेट ठप्प, कॉलही जात नाही
दिलासा! सोने आणि चांदीच्या दरात घसरण
ईशान्येकडील मिझोरम राज्याने हिंदुस्थानातील पूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान पटकावला