कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना, चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; सहा जणांचा मृत्यू

कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना, चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; सहा जणांचा मृत्यू

कल्याण पूर्व चिकणीपाडा येथील 40 वर्षे जुन्या सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब थेट चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळून सहा रहिवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एका दीड वर्षाच्या चिमुकलीसह चार महिलांचा समावेश आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान आणि केडीएमसीच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन सहा जणांना सुखरूपपणे बाहेर काढले. दरम्यान, या घरात चौथ्या मजल्यावर लादी बसवताना ही दुर्घटना झाल्याने घरमालक कृष्णा यादव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणच्या चिकणीपाडय़ात आज सप्तश्रृंगी इमारत कोसळून सहा जणांचा हकनाक बळी गेला. धक्कादायक म्हणजे 40 वर्षे जुनी जीर्ण झालेली ही इमारत कल्याण-डेंबिवली महापालिकेच्या धोकादायक यादीतच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या बेपर्वाईचे हे बळी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे धाव घेत शर्तीचे प्रयत्न करत ढिगाऱयाखालून 12 रहिवाशांना बाहेर काढले. मात्र दीड वर्षाच्या चिमुकलीस सहा जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेने क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कल्याण पूर्वेतील महाराष्ट्रनगर चिकणीपाडा येथे सप्तश्रुंगी इमारत आहे. तळमजल्यासह चार मजली असलेली ही इमारत अत्यंत जुनी आहे. या इमारतीत सुमारे 50 कुटुंबे राहात होती. ही इमारत धोकादायक अवस्थेत होती. आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास इमारतीचा चौथ्या मजल्यावरील स्लॅब पत्त्याप्रमाणे कोसळला. प्रत्येक मजल्यावरील घराच्या स्लॅबला पह्डत तो तळमजल्यावर कोसळला. या दुर्घटनेत 12 जण इमारतीमध्ये अडकले होते. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाराही जणांना बाहेर काढले.

काम सुरू असतानाच दुर्घटना

सप्तशृंगी इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू होते. जो भाग कोसळला त्यात भागातील चौथ्या माळ्यावर फ्लोरिंगवर लाद्या बसवण्याचं काम सुरू होत. याचदरम्यान ही दुर्घटना घडली.

– काही धोकादायक इमारतींमधील रहिवासी नोटिसा बजावूनही घरे रिकामी करण्यास तयार होत नाहीत. तर काही इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने या इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

– काही जमीनमालकांच्या आडमुठय़ा धोरणामुळे रहिवासी आधी आमचे पुनर्वसन करा मगच आम्ही घरे रिकामी करतो, अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे हजारो रहिवासी जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत.

मृतांची नावे – नमस्वी शेलार (दीड वर्षे), प्रमिला साहू (58), सुनीता साहू (37), सुजाता पाडी (32), सुशीला गुजर (78), व्यंकट चव्हाण (42) यांचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओला-उबर कॅब रद्द केली तर प्रवाशासह चालकालाही दंड; राज्य सरकारचा नवा निर्णय ओला-उबर कॅब रद्द केली तर प्रवाशासह चालकालाही दंड; राज्य सरकारचा नवा निर्णय
मुंबईत ओला-उबरसारख्या अ‍ॅग्रिगेटर कॅब सेवांसाठी राज्य सरकारने मंगळवारी नवा शासकीय आदेश (GR) जाहीर केला. या धोरणात चालक आणि प्रवासी दोघांनीही...
पर्सनल कामं उरकून घ्या, आठ दिवस पावसाचं धुमशान, हवामान खात्याचा मुंबईसाठी इशारा काय?
महिला – पुरुषांमधील संबंध म्हणजे जगाचा नियम आणि…, अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
लष्करचा सह-संस्थापक अमीर हमजा अपघातात गंभीर जखमी, लाहोरच्या रुग्णालयात मोजतोय अखेरच्या घटका
स्पेनमध्ये इंटरनेट ठप्प, कॉलही जात नाही
दिलासा! सोने आणि चांदीच्या दरात घसरण
ईशान्येकडील मिझोरम राज्याने हिंदुस्थानातील पूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान पटकावला