मधुमेही रुग्णांसाठी ही फळे आहेत सर्वात उत्तम, वाचा सविस्तर
On
मधुमेह ही एक गंभीर समस्या आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. म्हणजेच एकदा का तुम्ही या आजाराच्या विळख्यात असाल की मग त्यातून बाहेर पडणे खूप कठीण होऊन बसते. मधुमेह असलेल्या रुग्णांच्या रक्तातील साखर खूप वेगाने वाढू लागते, ज्यामुळे शरीरात अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांना सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. अशा परिस्थितीत अनेक आरोग्य तज्ज्ञ भाज्या आणि फळे खाण्याचा सल्ला देतात.
हिंदुस्थानमध्ये दिवसागणिक मधुमेहींची संख्या ही वाढू लागली आहे. मधुमेह हा शरीर पोखरणारा रोग म्हणून ओळखला जातो. सध्याच्या घडीला मधुमेह होणे हे खूपच सर्वसामान्य झालेले आहे. मधुमेहामुळे शरीराचे होणारे नुकसान हे खूपच मोठे असते. असे असले तरीही मधुमेहावर आपण उत्तम प्रकारे मात मात्र करू शकतो. हिरव्या भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाची फळे आणि भोपळा, लिंबू, संत्री इत्यादी भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.
पीचपीच हे असे फळ आहे, ज्यामध्ये सर्व पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. यासोबतच यामध्ये नैसर्गिक साखर देखील असते. हे तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते. जर आपण पीचच्या ग्लायसेमिक इंडेक्सबद्दल बोललो तर त्याची जीआय रँकिंग 28 आहे. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.
गाजरगाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत करते. यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे. अशा परिस्थितीत पिवळ्या गाजराचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.
लिंबूमधुमेहाच्या रुग्णांसाठी लिंबाचे सेवन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. लिंबू पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यात कर्बोदके आणि कॅलरीज खूप कमी असतात. तसेच आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते. मधुमेहाच्या रुग्णांना डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांच्यासाठी लिंबूपाणी सर्वात फायदेशीर ठरू शकते.
भोपळ्याचे सेवन करा – संशोधनानुसार, पिवळ्या रंगाच्या भोपळ्यामध्ये भरपूर फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. मेक्सिको आणि इराण सारख्या अनेक देशांमध्ये मधुमेहावर उपचार करण्यासाठी भोपळ्याचा वापर केला जातो. वास्तविक, भोपळ्यामध्ये पॉलिसेकेराइड्स नावाचे कार्बोहायड्रेट जास्त असते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
07 May 2025 00:04:41
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवार (7 मे) देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल केले जाणार आहे. महाराष्ट्रातील...
Comment List