बुधवारी रत्नागिरीत पाच ठिकाणी मॉक ड्रील, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात उद्या सायंकाळी 4 वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात येणार आहे. याठिकाणी सायरन वाजविला जाणार असून, या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

आज ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम नियोजन व पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सहायक उपनियंत्रक धमेंद्र जाधव, संबंधित विभागाचे अधिकारी आणि नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रत्नागिरी तहसिलदार कार्यालय, रत्नागिरी रेल्वेस्थानक, राजापूर नगरपालिका, दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील एक ग्रामपंचायत येथे उद्या सायंकाळी 4 वाजता ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. यावेळी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथोमोपचार या बाबी सज्ज असणे आवश्यक आहे. यामध्ये आपदा मित्र आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक यांचा समावेश करावा. जिल्ह्यातील तालुकास्तरीय यंत्रणांनी आपले नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावे. उद्या मत्स्यविभाग, बंदरे, मेरीटाईम बोर्ड, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू, अल्ट्राटेक आदी कंपन्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक वसाहतीमधील महाविद्यालयांनी मॉक ड्रिल करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा अशा सूचना, जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी बैठकीत दिल्या.

बैठकीच्या सुरुवातील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी मॉक ड्रिलच्या अनुषंगाने संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. उद्या 4 वाजता जिल्ह्यातील पाच ठिकाणी आॕपरेशन अभ्यास अंतर्गत सायरन वाजवला जाणार आहे. रंगीत तालीम करण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वरळीच्या वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई वरळीच्या वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई
एका गुह्यात आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता बेजबाबदार काम केल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या निलंबनाची कारवाई...
शस्त्र विक्रीसाठी आलेल्यांना अटक
महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची आगेकूच
Operation Sindoor – दहशतवादाविरुद्ध हिंदुस्थानचे ‘ऑपरेशन सिंदूर’, पाकिस्तानातील 9 ठिकाणी एअर स्ट्राइक
पतंजली संबंधित अन्नाचे फॅक्ट आणि नियम पाळाल, तर आरोग्य सुदृढ होईल…
समुद्राची पातळी इतक्या वेगाने का वाढत आहे? नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले कारण
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून चालकासह तिघांचा मृत्यू