‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

युद्धबंदीच्या घोषणेनंतर विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण यांनी या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत मोठी मागणी केली आहे. युद्धबंदीनंतर ज्या घटना घडल्या त्या वाईट आहेत, सोशल मीडियावर धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या, मोदी प्रेमी मिडीयावर कारवाई किंवा दंड झाला पाहिजे अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 

युद्धबंदीनंतर ज्या घटना घडल्या त्या वाईट आहेत. सोशल मीडियावर धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या, मोदी प्रेमी मीडियावर कारवाई किंवा दंड झाला पाहिजे, खोट्या बातम्या देण्यात आल्या, त्यामुळे जगभारत आपलं हसू झालं. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे, त्यांना निलंबित करा अशी मागणीही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, युद्धबंदीनंतर ज्या घटना घडल्या त्या वाईट आहेत, योग्य ती माहिती दिली जात नाहीये,  त्यामुळे आमची मागणी आहे की योग्य ती माहिती द्यायला हवी आणि संसदेत विशेष सत्र ऑपरेशन सिंदूर नंतर बोलवायला हवं होतं. मी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलरशी केली नाही, पण हिटलरच्या काळामध्ये जशी एकाधिकारशाई होती तसंच देशात, राज्यात  घडत आहे.

राज्यात गुन्हेगारीनं कळस गाठला आहे, बीडमध्ये सर्रास गुन्हेगारीच्या घटना सुरू आहेत. यावर कुणाचा अंकुश नाहीये, त्यामुळे राज्य वाऱ्यावर सोडले का? असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारची भूमिका ही दुटप्पी आहे, मध्य प्रदेशचे मंत्री विजयशाह यांनी जे वक्तव्य केलं, ते अतिशय चुकीचं आहे. त्याची जितकी निंदा करावी तेवढी कमी आहे,  तातडीने त्यांचा राजीनामा मोदी सरकारने घ्यायला हवा होता, पण तसं होताना दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मार्केट यार्डातील आडत्यांना 100 ते 125 कोटींचा गंडा,  बाजार समितीच्या माजी संचालकाकडून फसवणूक मार्केट यार्डातील आडत्यांना 100 ते 125 कोटींचा गंडा, बाजार समितीच्या माजी संचालकाकडून फसवणूक
आमच्याकडे आर्थिक गुंतवणूक करा, तुम्हाला जादा परतावा देऊ असे सांगून मार्केट यार्डातील छोटय़ा-मोठय़ा शेकडो आडतदार, व्यापाऱयांची 125 कोटी रुपयांची फसवणूक...
कोविड आला, मास्क घाला; मुंबईत 53 रुग्ण, महापालिका अलर्ट! सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयांत 112 खाटा राखीव!!
मुंबईकरांनो, खबरदारी घ्यायलाच हवी, डॉ. अविनाश सुपे यांचा सल्ला
केईएमने कोविडबाबत उपाययोजना तातडीने कराव्यात! शिवसेना शिष्टमंडळाची रुग्णालय प्रशासनाकडे मागणी 
शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेचा तीव्र विरोध, विनायक राऊतांचे सरकारला आव्हान
सिंगापूर, हाँगकाँग आणि पूर्व आशियात रुग्णसंख्येत वाढ
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, जगबुडी नदीत कार कोसळून पाच जण ठार; अंत्यविधीसाठी जाणाऱ्या मीरारोडच्या कुटुंबावर काळाचा घाला