60 वर्षांच्या आमिर खानचा रोमँटिक अंदाज; कारमध्ये बसताच गर्लफ्रेंडला केलं किस
बॉलिवूडमध्ये आता अफेअर आणि घटस्फोटाच्या चर्चां अगदीच सामान्य झाल्या आहेत. आजकाल तर त्यात वयाची कोणतीच मर्यादा पाळली जात नाही. त्यातील एक जोडी जी सध्या प्रचंड चर्चेत आहे ती जोडी म्हणजे आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट. आमिर खानला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखलं जातं. आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो.
आमिर खान गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत पुन्हा एकदा स्पॉट
काही महिन्यांपूर्वीच आमिर खाननं त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख करून देऊन त्यांचे नाते मीडियासमोर अधिकृतरीत्या व्यक्त केलं. 60व्या वाढदिवसादिवशी त्याने त्यांच्या नात्याची कबुली दिली. तेव्हापासून त्यांची एकत्र झलक दिसली की सोशल मीडियावर खळबळ माजते. नाते अधिकृत केल्यानंतर तर ही जोडी अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.
कॅमेऱ्यांकडे लक्ष जाताच गोरीने तिचा चेहरा लपवला
आता पुन्हा एकदा त्यांचा मुंबई एअरपोर्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गौरी आमिरला एअरपोर्टवरून घ्यायला आली होती. आमिर जसा कारजवळ येतो, तस गौरी पटकन दुसऱ्या सीटवर शिफ्ट होते आणि आमिरसाठी जागा करते. मात्र कॅमेऱ्यांकडे लक्ष जाताच ती आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
आमिर आणि गौरीचा रोमान्स कॅमेरात कैद
पुढे गाडी वळताच आमिर गौरीला प्रेमाने किस करतानाही दिसत आहे. आमिर गौरीच्या दिशेने झुकतो आणि गौरीही त्याला किस करते. त्यांचा हा रोमान्स कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, आमिर आणि गौरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. अनेकांनी त्यांच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला, तर काहींनी त्यांना ट्रोलही केले.
गौरी स्प्रॅट ही केवळ आमिरची पार्टनर नाही तर …..
या व्हिडिओत आमिरने प्रिंटेड कुर्ता आणि निळी धोती पायजमा असा एकदम पारंपरिक वेश परिधान केलेला दिसत होता, तर गौरीने पांढऱ्या कुर्तीसोबत निळी डेनिम जीन्स घातली होती. दोघंही कारमध्ये बसताना पॅप्सना हात दाखवून आणि एका हास्यसह निरोप दिला. गौरी स्प्रॅट ही केवळ आमिरची पार्टनर नाही, तर अनेक वर्षांपासून त्याच्या प्रोडक्शन हाऊसशी जोडलेली एक विश्वसनीय सहकारी आहे.
कामाबद्दल बोलायचं झालं तर….
दरम्यान आमिरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. पण या ट्रेलरपेक्षाही सध्या चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे आमिर आणि गौरीचं हे नातं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List