बॉलिवूडचा निरोप घेत स्वीकारला संन्यास, केलं टक्कल पण अपघातानंतर असं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री
Actress Life: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आल्या. पण त्यांची लोकप्रियता फार काळ टिकली नाही. अशात अनेक अभिनत्रींनी लग्न करत संसार थाटला, तर काही अभिनेत्री आयुष्यभर एकटं राहण्याचा विचार केला. पण एक अभिनेत्री अशी देखील जिने असंख्य चाहते असताना आणि करीयर उच्च शिखरावर असताना संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही ‘आशिकी’ फेम अभिनेत्र अनू अग्रवाल आहे.
अनू अग्रवाल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. 1998 मध्ये झालेल्या गंभीर अपघातापूर्वीच अनूने संन्यास स्वीकारला होता.
मुलाखतीत अनू म्हणाली, ‘मी कधीच पैशांसाठी सिनेमांमध्ये काम केलं नाही. मी एकटीच राहायची. मला फक्त चांगलं काम करायचं होतं आणि ते झाल्यानंतर मी बॉलिवूडचा निरोप घेतला. एका गुरुजींनी मला सांगितलं होतं की, हजारोंमध्ये एका संन्यासी मानसिकतेचा असतो. ज्यांनी कसलीच ओढ नसते. तेव्हा मी म्हणाले मला माझी कॉफी सर्वात जास्त प्रिय आहे.’
‘तेव्हा त्यांनी मला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. मी आनंदी होती पण तेवढ्यात त्यांनी मला टक्कल करण्यास सांगितलं. मला टक्कल करणारी गोष्ट पटली नाही. पण घरी आल्यानंतर मी विचार केला की, बॉलिवूडमध्ये तर आता काम करायचं नाही. त्यामुळे कशाला हवे आहेत केस…’
‘बॉलिवूड तर मी सोडूनच दिलं होतं. अशात मी अध्यात्माबद्दल अनेक गोष्टी वाचू लागली. तरी देखील माझ्यातली शक्ती मी शोधू शकत नव्हती. मी सर्व वेद – ग्रंथ वाचले आहे. पण लोकांनी माझा पाठलाग करणं सोडलं नाही. अपघात झाला तेव्हा मी मानसिक तणावात होती. तेव्हा शरीराचं तुटणं देखील गरजेचं होतं. बॉलिवूड सोडल्यानंतर बराच काळ मी टक्कल करुन संन्यासाचं आयुष्य जगत होती. फक्त सर्वांना योगा शिकवायची.’ असं देखील अनू म्हणाली होती.
अनू अग्रवाल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘आशिकी’ सिनेमातून यश मिळाल्यानंतर अभिनेत्रीने ‘गदब तमाशा’, ‘किंग अंकल’, ‘राम शास्त्र’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण कार अपघातानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक बदल झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List