नवरा वरात घेऊन निघाला, नवरीच्या पोटात दुखू लागले, कुटुंबीयांनी डॉक्टरकडे नेले; औषधं घेताच तरुणीचा मृत्यू
पोटदुखीचं औषध घेताच वधूचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चुकीचे औषध दिल्याप्रकरणी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. रिंकी असे मयत वधूचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील गुरसहायगंजमध्ये ही घटना घडली. रिंकूच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.
किसवापूर येथील रहिवासी असलेल्या रिंकीचे उमर्दामधील राहुलसोबत लग्न ठरले होते. किसवापूर येथे रिंकीच्या घरी शनिवारी रात्री हा विवाहसोहळा पार पडणार होता. हळदीचा कार्यक्रमही आनंदात पार पडला. राहुल वरात घेऊन निघाला. मात्र याचदरम्यान रिंकीच्या पोटात दुखू लागले. घरच्यांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले.
डॉक्टरांनी रिंकीला इंजेक्शन आणि औषध दिले. मात्र औषध घेताच तिची प्रकृती बिघडली आणि ती बेशुद्ध झाली. यानंतर कुटुंबीय तिला सरकारी रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरने चुकीची औषधे दिल्यामुळे रिंकीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईंकांनी केला आहे. संबंधित डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List