‘विराट कोहलीला भारतरत्न दिला पाहिजे…’, CSK च्या माजी खेळाडूची सरकारकडे मागणी

‘विराट कोहलीला भारतरत्न दिला पाहिजे…’, CSK च्या माजी खेळाडूची सरकारकडे मागणी

सचिन तेंडूलकरनंतर टीम इंडियाच्या महान खेळाडूंमध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश केला जातो. विराटने 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यापूर्वी त्याने टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केलं होतं. विराट कोहली IPL आणि वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीच्या हिंदुस्थानी क्रिकेटसाठीच्या योगदानाचा सन्मान व्हावा म्हणून सुरैश रैनाने विराटला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

बंगळुरूचे नेतृत्व एक धक्काच, रजत पाटीदारने पॉडकास्टवर शेअर केली भावना

टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने Jio Hotstar ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट कोहीलबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “हिंदुस्थानी क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल विराट कोहलीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं पाहिजे”. असं म्हणत सुरैश रैनाने सरकारकडे मागणी केली आहे. सध्याच्या घडीला सचिन तेंडुलकर एकमेव क्रिकेटर आहे, ज्याला 2014 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सुरैश रैनाच्या मागणीची सरकार दखलं घेणार का नाही? हे पुढील काही दिवसांमध्ये समजेलच. परंतु सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहलीची गणना टीम इंडियाचा सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून केली जाते. विराट कोहलीने आपल्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 123 कसोटी सामने खेळले आहेत. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकं ठोकली असून 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अजितदादांचे एक दगडात दोन पक्षी, टाकला मोठा डाव, राजकारणातून मोठी बातमी अजितदादांचे एक दगडात दोन पक्षी, टाकला मोठा डाव, राजकारणातून मोठी बातमी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख...
‘कजरा रे’ गाण्यावर ऐश्वर्या राय अभिषेकसह लेक आराध्याही थिरकली; लग्नातला तो व्हिडिओ व्हायरल
7 वर्षे रिलेशन, अन् लग्न…मुंबईच्या ‘या’ अभिनेत्रीची खास लव्ह स्टोरी माहिती आहे का?
IPL 2025 – अगदी थाटात! सुदर्शन आणि गिलचा विध्वंस, दिल्लीचा धुव्वा उडवत गुजरातली प्लेऑफमध्ये एन्ट्री
ज्योती मल्होत्रानंतर आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक, ISI ला पाठवत होता गोपनीय माहिती
Gadchiroli News – यू टर्न घेताना ट्रकची कारला धडक, अपघातात तिघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
मुंबईचे माजी यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज विजय उर्फ पापा कारखानीस कालवश