लश्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा पाकिस्तानात खात्मा, हिंदुस्थानातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा होता सूत्रधार
लश्कर-ए-तोयबाचा कमांडर दहशतवादी सैफुल्ला खालिद याची पाकिस्तानात हत्या झाल्याचे समोर आलं आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. सैफुल्ला बऱ्याच काळापासून नेपाळमधून नापाक कारवाया चालवत होता. भारतातील तीन हल्ल्यांमध्ये सैफुल्लाचा सहभाग होता. हिंदुस्थानचा तो मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता.
सैफुल्ला खालिद हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर होता. लश्कर-ए-तोयबाने त्याला भारतात हल्ल्यांची तयारी करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, तो अनेक वर्षे नेपाळमध्ये तळ ठोकून होता आणि तेथूनच भारतात सतत दहशतवादी हल्ले करत होता. हिंदुस्थानी गुप्तचर संस्थांना त्याच्याबद्दल माहिती मिळताच तो नेपाळमधून पाकिस्तानात पळाला.
2006 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर हल्ल्याचा कट, 2001 मध्ये रामपूरमधील सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ला आणि 2005 मध्ये बंगळुरूमधील हल्ला यात सैफुल्लाचा सहभाग होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List