लोकशाहीचे तीन स्तंभ समान- सरन्यायाधीश भूषण गवई; महाराष्ट्र भेटीदरम्यानच्या शिष्टाचारातील त्रुटींवर तीव्र नाराजी

लोकशाहीचे तीन स्तंभ समान- सरन्यायाधीश भूषण गवई; महाराष्ट्र भेटीदरम्यानच्या शिष्टाचारातील त्रुटींवर तीव्र नाराजी

महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पदावर नियुक्ती झाल्यानंतर ते जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात आले. मुंबईत सत्कार समारंभ झाल्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांना राज्याच्या प्रशासनातील निष्काळजीपणाचा कटू अनुभव घ्यावा लागला आहे. त्यांच्या सत्कार कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त हे तीन वरिष्ठ अधिकारी गैरहजर होते. शिष्टाचारातील या गंभीर त्रुटीवर सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली आहे. लोकशाहीचे तीन स्तंभ समान आहेत. न्यायमूर्तींनी प्रोटोकॉल तोडला असता, तर सर्वोच्च न्यायालयाला विशेष अधिकार देणाऱ्या अनुच्छेद 142 बद्दल चर्चा सुरू झाली असती, अशी महत्वपूर्ण टिप्पणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या प्रशासनातील तीन प्रमुख अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले. न्यायपालिका, विधिमंडळ आणि कार्यकारी हे लोकशाहीचे तीन स्तंभ समान आहेत. प्रत्येक संवैधानिक संस्थेने इतर संस्थांना परस्पर प्रतिसाद दिला पाहिजे. परस्परांबद्दल आदर दाखवला पाहिजे. जेव्हा महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती हिंदुस्थानची सरन्यायाधीश बनते आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राला भेट देते, तेव्हा जर महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक किंवा मुंबई पोलिस आयुक्त यांना उपस्थित राहणे योग्य वाटत नसेल तर त्यांनी त्यावर विचार करणे आवश्यक आहे. प्रोटोकॉल ही काही नवीन गोष्ट नाही, हा एका संवैधानिक संस्थेकडून दुसऱ्या संवैधानिक संस्थेला मिळणाऱ्या आदराचा प्रश्न आहे, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Gadchiroli News – यू टर्न घेताना ट्रकची कारला धडक, अपघातात तिघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी Gadchiroli News – यू टर्न घेताना ट्रकची कारला धडक, अपघातात तिघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
राष्ट्रीय महामार्गावर यू टर्न घेताना मालवाहू ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी...
मुंबईचे माजी यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज विजय उर्फ पापा कारखानीस कालवश
नवरा वरात घेऊन निघाला, नवरीच्या पोटात दुखू लागले, कुटुंबीयांनी डॉक्टरकडे नेले; औषधं घेताच तरुणीचा मृत्यू
93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीला गुजरातमधून मुंबईत आणणार; खटल्याला गती मिळणार
पठ्ठ्या कंबर कसून करतोय सराव, 10 किलो वजन केलं कमी; इंग्लंड दौऱ्यासाठी संधी मिळणार?
मायावतींनी आकाश आनंद यांना मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून केलं नियुक्त, आधी पक्षातून केली होती हकालपट्टी
रशियाने युक्रेनवर डागले 273 ड्रोन, कीव्हसह 13 शहरांवर हल्ला