70 वर्षांच्या अभिनेत्याचे 30 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन; झाला ट्रोल
फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे काही बोल्ड सीन असतात ज्यात अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या वयातील फरक फार गृहीत धरला जात नाही. पण अशा सीन्समुळे कलाकार ट्रोल मात्र नक्कीच होतात. एका अभिनेत्यासोबत असाच काहीसा हा किस्सा घडला आहे. या अभिनेत्याने एका चित्रपटात 30 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत केलं लिपलॉकचा सीन केल्यानं तो चांगलाच ट्रोल होत आहे.
30 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत केलं लिपलॉकचा सीन केल्यानं अभिनेता ट्रोल
हा सुपरस्टार म्हणजे कमल हसन. कमल हसन यांच्या ‘ठग लाईफ’ या चित्रपटाचा ट्रेलर 17 मे रोजी प्रदर्शित झाला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली. या चित्रपटात कमल हसन आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांची जोडी पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तथापि, ट्रेलरला काही टीकाही सहन करावी लागली, विशेषतः कमल हसन यांच्या लिपलॉक दृश्यासाठी आणि रोमँटिक दृश्यासाठी.
नेटकऱ्यांकडून झाले ट्रोल
‘ठग लाईफ’च्या ट्रेलरमधील कमल हसन आणि त्रिशा कृष्णन यांच्या दृश्याचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. तसेच आणखी एक चित्र ज्यामध्ये तो अभिनेत्री अभिरामीला किस करत आहे. हे फोटो शेअर करताना, नेटकऱ्यांनी लिहिले आहे की, “नाही देवा, कृपया नाही” कमल 70 वर्षांचा आहे आणि त्रिशा 42 वर्षांची आहे. यानंतर दोघांमधील वयाच्या फरकावरून आणि त्यांच्यातील या सीन्सवरून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
त्याच्या अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन
एका युजरने लिहिले आहे की “एका म्हाताऱ्या माणसाने तरुण अभिनेत्रीशी प्रेमसंबंध ठेवणे ठीक आहे, जर ते योग्य पद्धतीने दाखवले गेले तर. एक म्हाताऱ्याने तरुण असल्याचे भासवून तरुण मुलींशी प्रेमसंबंध करणे विचित्र आहे.” दुसऱ्याने लिहिले, “हे खूप विचित्र आहे.”
कमल आणि त्रिशा यांच्या वयाच्या फरकावर भाष्य करताना एकाने कमेंटमध्ये लिहिले होते, “अरे… भाऊ, अरे… हे काय आहे भाऊ?” एका युजरने पुढे म्हटले, “मणिरत्नम त्यांचा वारसा उद्ध्वस्त करत आहेत.”
70 वर्षांचे कमल हसन आणि लिपलॉक दृश्य
काही चाहत्यांनी कमल हसनचा बचावही केला. एकाने लिहिले, “या जोडीमध्ये कोणतीही अडचण नाही, कारण कथानकात एका जुन्या गुंडाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे स्पष्टपणे दाखवले आहे”, दुसऱ्याने कमेंट केली, “हे दोघे संमतीने प्रौढ लोक आहेत, पण तरीही, ते कमलच्या पत्नीची भूमिका करण्यासाठी एखाद्या मोठ्या अभिनेत्रीला कास्ट करू शकले असते.”
चित्रपटामध्ये काय दाखवण्यात आलं आहे?
मणिरत्नम दिग्दर्शित या गँगस्टर ॲक्शन ड्रामामध्ये कमल हसन, सिलांबरसन, त्रिशा कृष्णन, सान्या मल्होत्रा, अभिरामी, अशोक सेल्वन, ऐश्वर्या लक्ष्मी, जोजू जॉर्ज, नस्सर, अली फजल, पंकज त्रिपाठी, रोहित सराफ आणि वैयापुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 1987 च्या ‘नायकन’ या प्रतिष्ठित चित्रपटानंतर मणिरत्नम आणि कमल हासन यांना या चित्रपटात पुन्हा एकत्र आणले आहे. हा चित्रपट 5 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List