“मंदिर खोदलं तर मशीद मिळेल, कुठपर्यंत खोदणार?”; प्रकाश राज यांनी मोदी सरकारला घेरलं

“मंदिर खोदलं तर मशीद मिळेल, कुठपर्यंत खोदणार?”; प्रकाश राज यांनी मोदी सरकारला घेरलं

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केंद्र सरकारला प्रश्न विचारण्याबद्दल आणि सामाजिक मुद्द्यांवर आपलं बेधडक मत व्यक्त केलं. प्रकाश राज हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या मुलाखतीत त्यांनी म्हटलंय की सरकारच्या धोरणांवर आणि निर्णयांवर प्रश्न विचारणं हा त्यांचा अधिका आहे. कारण लोकशाहीमध्ये नागरिकांना सरकारकडून उत्तरं मागण्याचा अधिकार आहे. “माझी टीका कोणत्याही विशिष्ट व्यक्तीविरोधात नाही, तर समाजातील वाढती असमानता आणि धार्मिक कट्टरतेविरोधात आहे”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रकाश राज यांनी मंदिर-मस्जिदसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर टिप्पणी करताना म्हटलं की, जर यात खोलवर गेलो तर तिथे बुद्धांची शिकवण मिळेल, जे शांती आणि करुणेविषयी सांगतं. ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश राज म्हणाले, “लोक नेहरुंबद्दल विचारतात, जेव्हा त्यांचं निधन झालं होतं तेव्हा मी जन्मालाही आलो नव्हतो. मी काय करू? मी तिथे जाऊ का आणि मी कुठपर्यंत खोदून जाईन? औरंगजेब.. जाणार का? आज तुम्ही मशीद खोदली की तुम्हाला मंदिर दिसेल. जर तुम्ही मंदिर खोदलं तर तुम्हाला बुद्ध सापडतील. भाऊ, तू कुठपर्यंत खोदत जाणार? टिपू सुलतानशी माझा काय संबंध, औरंगजेबाशी माझा काय संबंध? हा कदाचित मी झोपलो आणि उशिरा उठलो ही समस्या असेल का? माझ्या प्रश्नावरून समस्या अशी आहे की मी प्रश्न विचारतोय. हीच तुमची समस्या आहे.”

प्रकाश राज यांनी यावेळी मोदी सरकारवर निशाणा साधला आणि धार्मिक स्थळांबाबत सुरू असलेल्या वादांवर प्रश्न उपस्थित केले. “धार्मिक उन्मादात अडकण्याऐवजी समाजाने शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. मंदिर-मशीदसारखे वाद केवळ लोकांमध्ये फूट पाडतात. देशाच्या खऱ्या समस्यांवर एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मी कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही. परंतु जर कोणतंही चुकीचं धोरण आखलं गेलं तर त्याचा विरोध करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे”, असं ते पुढे म्हणाले.

प्रकाश राज यांनी असंही स्पष्ट केलं की, त्यासाठी त्यांना कितीही टीका सहन करावी लागली तरी ते त्यांचे विचार मोकळेपणे व्यक्त करण्यापासून कधीही मागे हटणार नाहीत. “एक कलाकार म्हणून समाजाला आरसा दाखवणं आणि लोकांना विचार करण्यास प्रेरित करणं ही माझी जबाबदारी आहे. प्रश्न विचारणं आणि सत्य बोलणं ही लोकशाहीची खरी ताकद आहे. तरुणांनी कोणत्याही मुद्द्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, तर वस्तुस्थिती तपासून पहा आणि काय बरोबर आहे, काय चूक आहे ते स्वत: ठरवा”, असा सल्ला त्यांनी दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसासह आणखी एक नवं संकट, सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट IMD Weather Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसासह आणखी एक नवं संकट, सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट
देशातील अनेक भागांमध्ये सध्या कडाक्याचं ऊन पडत आहे. तपमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे रस्ते सुनसान झाले आहेत. याचदरम्यान...
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या इन्स्टाग्रामवर भारतात बंदी, वाणी कपूरने उचलले मोठे पाऊल; चाहते देखील हैराण
आधी रडतानाचा व्हिडीओ पोस्ट, आता इरफान खानच्या मुलानं उचललं मोठं पाऊल; एका क्षणात…
अक्किनेनी कुटुंबातील तो ‘अभिनेता’, 50 व्या वर्षी करणार दुसरं लग्न, 46 व्या वर्षी बहीण आहे अविवाहित!
शाळेच्या आवारातच मुख्याध्यापिका आणि ग्रंथपाल यांच्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
इस्रायलच्या विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला, एअर इंडियाचे तेल अवीवला जाणारे विमान अबू धाबीकडे वळवले
Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना भिडली, इतके जण जखमी