आधी विराटवर चिडला, नंतर केली उपरोधिक टिप्पणी; आता क्रिकेटरने अनब्लॉक करताच राहुल वैद्यचे बदलले सूर
गायक राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. क्रिकेटर विराट कोहलीने त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं राहुलने म्हटलं होतं. यावरून त्याने विराटवर उपरोधिक टिप्पणीसुद्धा केली होती. या सर्व ड्रामानंतर अखेर विराटने त्याला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक केलं आहे.
विराटने अनब्लॉक करताच राहुलने त्याचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. 'मला अनब्लॉक करण्यासाठी विराट कोहली तुझे आभार. क्रिकेटमधील तू सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेस आणि भारताचा तू गर्वआहेस. जय हिंद. तुला आणि तुझ्या कुटुंबीयांवर सदैव देवाचा आशीर्वाद राहो', अशी पोस्ट राहुलने लिहिली आहे.
'ज्या बालिश लोकांनी माझ्या पत्नीला आणि बहिणीला शिवीगाळ केली, माझ्या लहान मुलीचे फोटो मॉर्फ केले आणि मला, माझ्या जवळच्या व्यक्तींना असंख्य द्वेषपूर्ण मेसेज पाठवले, त्यांनासुद्धा देव सदबुद्धी देवो. मी त्याच भाषेत किंवा त्याहून वाईट प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण त्यामुळे फक्त नकारात्मकता पसरेल आणि त्यातून काहीच सिद्ध होणार नाही', अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना सुनावलं आहे.
या पोस्टमध्ये राहुलने विराटच्या भावाचाही उल्लेख केला आहे. "विकास कोहली भावा, तू जे काही मला म्हणालास, त्याचं मला वाईट वाटलं नाही. मला माहीत आहे की तू माणूस म्हणून खूप चांगला आहेत. मँचेस्टर किंवा ओवल स्टेडियमबाहेर झालेली तुझी भेट आणि माझ्या गायनाविषयी तू बोललेल्या चांगल्या गोष्टी मला आजही आठवत आहेत", असं त्याने पुढे म्हटलंय.
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं सांगितल्यानंतर राहुलने त्याच्या चाहत्यांनाही सुनावलं होतं. "विराट कोहलीचे चाहते हे त्याच्यापेक्षाही मोठे जोकर्स आहेत", असं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर विकास कोहलीने राहुलसाठी पोस्ट लिहिली होती. एवढी मेहनत आपल्या गाण्यावर घेतली असती तर कदाचित प्रसिद्ध झाला असला, अशी टीका विकासने केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List