शाहरुख खान त्याच्या मोकळ्या वेळेत घरी काय करतो? उत्तर जाणून वाटेल कौतुक
बॉलीवूड कलाकारांबद्दल जाणून घेण्याची सर्वंनाच उत्सुकता असते. सेलेब्रिटी कशाप्रकारचं जेवण करतात तिथून ते कोणत्या ब्रॅंडचे कपडे वापरतात इथपर्यंत सर्वकाही जाणून घेण्याबाबत चाहत्यांना उत्सुकता असते.त्यातच आता एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडचा किंग खान, सुपरस्टार शाहरुखने तो त्याच्या मोकळ्या वेळेत काय करतो? याबद्दल खुलासा केला आहे.
मोकळ्या वेळेत शाहरुख खान काय करतो?
लाखो-करोडो दिलोंकी धडकन म्हणजे बादशाह शाहरूख खान. त्यामुळे तो कुठे जातो, काय करतो त्याच्या सर्व गोष्टींवर चाहत्यांचं आणि पापाराझींज लक्ष असतंच. पण जेव्हा तो घरी असतो. त्याच्याकडे मोकळा वेळ असतो तो काय करतो किंवा त्याचे रुटीन काय असते. याबद्दल त्याने एका कार्यक्रमादरम्यान सांगितल आहे. या कार्यक्रमात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण एकत्र उपस्थित होते आणि करण जोहर त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर बोलत होता. दरम्यान, करण जोहरने विचारले की जेव्हा शाहरुख खान पूर्णपणे मोकळा असतो आणि कॅमेरे त्याचा पाठलाग करत नसतात तेव्हा तो काय करतो?
“जे काहीही करत नाहीत, ते चमत्कार करतात”
मुंबईत झालेल्या वेव्हज कार्यक्रमादरम्यान, शाहरुख खानने या प्रश्नाचे उत्तर देत करणला म्हटलं की, “खरं तर करण, तुला हे माहित असले पाहिजे, दीपिकालाही हे माहित असले पाहिजे. माझे जवळचे मित्र ज्यांच्यावर मी खूप प्रेम करतो त्यांनीही ते पाहिले असेल. मी काहीही करत नाही. मी हे आधीच सांगितले आहे, माझ्या वडिलांनी मला शिकवले आहे. जे काहीही करत नाहीत, ते चमत्कार करतात. म्हणून मी काहीही करत नाही मित्रा. मी… मी प्रत्यक्षात काहीही करत नाही.”
“मी घरातील कामे मात्र नक्की करतो…”
आपला मुद्दा पुढे नेत शाहरुख खान नंतर म्हणाला, “मी घरातील कामे मात्र नक्की करतो. माझी पत्नी मला ती खोली स्वच्छ करायला सांगते, तर मी ते करतो. आणि ही अगदी खरी गोष्ट आहे. मी माझ्या मुलाच्या नोटबुकला कव्हर घातलं असतं, पण आजकाल नोटबुकही उपलब्ध नाहीत पॅड वापरले जातात. जर त्याने मला आयपॅड अपडेट करायला सांगितलं तर तेही मी करून देतो. मी अगदी छोटी-मोठी कामे करतो. किंवा मग मी काहीही करत नाही.”
“मी एक प्रकारच्या ध्यानस्थ अवस्थेत जातो”
तसेच शाहरुख खानला हा वेळ कशापद्धतीने घालवायला आवडतो याबद्दलही सांगितले. तो म्हणाला ” मी जास्त काम करणे, जास्त विचार करणे, जास्त काहीही करणे टाळतो. मी एक प्रकारच्या ध्यानस्थ अवस्थेत जातो. म्हणून मी माझ्या घरात असाच बसलेलो असतो. जेव्हा मी सेटवर नसतो तेव्हा मी काहीही करत नाही. मी हे प्रामाणिकपणे सांगत आहे. पण अर्थातच मी माझ्या मित्रांना आनंदी ठेवतो, मुलांसोबत खेळतो. पण या सगळ्यांव्यतिरिक्त मी दुसरे काही करतो असं मला वाटत नाही. मला स्वतःसोबत वेळ घालवायला आवडतं”. असं सांगत त्याला त्याचा वेळ घालवायला कसा आवडतो याबद्दल सांगितलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List