संजूबाबा आणि रेखा यांनी कोणाच्या न कळत केलेलं लग्न? काय आहे संपूर्ण प्रकरण
Sanjay Dutt & Rekha Affair: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा आज वयाच्या 70 व्या वर्षी देखील एकट्याच राहतात. असं नाही की रेखा यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली नाही. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत रेखा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. रेखा यांच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत झाली. अभिनेता संजय दत्त याच्यासोबत देखील अनेकदा रेखा यांच्या नावाची चर्चा रंगली होती. दोघांनी लग्न केल्याची देखील अफवा पसरली होती. रेखा, संजूबाबाच्या नावाचं सिंदूर लावते… अशा देखील चर्चा रंगल्या. पण संजूबाबा याच्या वडिलांमुळे दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही… असं देखील अनेकदा समोर आलं.
संजय दत्त आणि रेखा यांच्या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जेव्हा संजूबाबाच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. जेव्हा रेखा मात्र बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर होत्या. 1984 मध्ये रेखा आणि संजूबाबा एका सिनेमात एकत्र काम करत होते आणि सिनेमाचं नाव होतं ‘जमीन आसमान’…
हा असा काळ होता जेव्हा संजूबाबाचं करियर धोक्यात होतं. अशात रेखा यांनी संजय याच्या ड्रग्सबद्दल देखील माहिती झालं होतं. संजूबाबाबद्दल सर्वकाही माहिती असल्यामुळे रेखा यांनी अभिनेत्याला कायम पाठिंबा दिला. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, रेखा आणि संजय दत्त यांच्यामध्ये भावनिक नातं तयार झालं होतं. ‘जमीन आसमान’ सिनेमात एकत्र झळकल्यानंतर संजूबाबा आणि रेखा यांनी लग्न केल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. रिपोर्टनुसार, दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्यानंतर, संजूबाबाचे वडील सुनील दत्त, रेखा यांना भेटण्यासाठी गेले आणि मुलापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यादिवसानंतर रेखा यांनी संजूबाबापासून दूर राहणं पसंत केलं.
काही दिवसांनंतर रेखा यांनी एका पत्रकार परिषद ठेवली आणि संजूबाबासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं. रेखा म्हणाल्या होत्या, ‘संजय दत्त आणि माझ्याबद्दल रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. माझ्या पारंपरिक लूकवर सिंदूर उठून दिसतो म्हणून सिंदूर लावते… माझं कामचं माझं सिंदूर आहे..’ असं देखील रेखा म्हणाल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List