पालघरमध्ये रासायनिक कारखान्यात गॅस गळती, दहा कामगारांची प्रकृती बिघडली

पालघरमध्ये रासायनिक कारखान्यात गॅस गळती, दहा कामगारांची प्रकृती बिघडली

पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रासायनिक कारखान्यामध्ये निष्काळजीमुळे गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दहा पेक्षा अधिक कामगारांची प्रकृती बिघडली आहे. ही दुर्दैवी घटना बोईसच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये घडली आहे. विशेष म्हणजे जेव्हा गॅस गळतीमुळे कामगारांची प्रकृती बिघडल्याचं लक्षात आलं तेव्हा या रासायनिक कारखान्याच्या मॅनेजरनं ही घटना दाबवण्याचा प्रयत्न केला असा आरोप होत आहे. या घटनेनंतर कारखान्याच्या व्यवस्थापकानं सर्व मजुरांना दुसऱ्या ठिकाणी हलवलं.

मात्र जेव्हा कामगारांना तीव्र वेदना होऊ लागल्या, डोळ्यांमध्ये आणि नाकामध्ये तीव्र जळजळ जाणवू लागली, त्यांची प्रकृती खालावली तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहाणी केली.

प्रकृती खालवल्यानंतर केलं रुग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार हा गॅस इतका विषारी होता की, या गॅसच्या संपर्कात जे मजूर आले, त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या, त्यांच्या डोळ्यात आणि नाकात तीव्र जळजळ होऊ लागली, त्यांची प्रकृती खालावली, ते जोरजोरात ओरडून लागले. सुरुवातीला या कारखान्याच्या व्यवस्थापकानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र कामगारांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं हे प्रकरण समोर आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही सुरक्षिततेची काळजी न घेता या कारखान्यामध्ये धोकादायक केमिकलचं उत्पादन सुरू होतं. यामुळे पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सध्या या कामगारांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन, घटनास्थळाची पाहाणी केली. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  यामुळे कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  कोणतीही सुरक्षेची काळजी घेण्यात आली नव्हती अशी माहिती समोर येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Gadchiroli News – यू टर्न घेताना ट्रकची कारला धडक, अपघातात तिघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी Gadchiroli News – यू टर्न घेताना ट्रकची कारला धडक, अपघातात तिघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
राष्ट्रीय महामार्गावर यू टर्न घेताना मालवाहू ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी...
मुंबईचे माजी यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज विजय उर्फ पापा कारखानीस कालवश
नवरा वरात घेऊन निघाला, नवरीच्या पोटात दुखू लागले, कुटुंबीयांनी डॉक्टरकडे नेले; औषधं घेताच तरुणीचा मृत्यू
93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीला गुजरातमधून मुंबईत आणणार; खटल्याला गती मिळणार
पठ्ठ्या कंबर कसून करतोय सराव, 10 किलो वजन केलं कमी; इंग्लंड दौऱ्यासाठी संधी मिळणार?
मायावतींनी आकाश आनंद यांना मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून केलं नियुक्त, आधी पक्षातून केली होती हकालपट्टी
रशियाने युक्रेनवर डागले 273 ड्रोन, कीव्हसह 13 शहरांवर हल्ला