लहानपणी आई-वडिलांचे निधन, आश्रमात मोठी झाली अभिनेत्री; मुंबईत दिग्दर्शकासोबत वाईट अनुभव
दीड वर्षांच्या मुलीने कार अपघातात आई गमावली. अशा परिस्थितीत त्या मुलीने आयुष्यभर आईच्या प्रेमासाठी तडफड पाहिली. त्यानंतर त्या मुलीने गरिबी पाहिली. ही आहे एका अभिनेत्रीची कहाणी, जिने हिंदी, भोजपुरी आणि गुजराती सिनेमात काम केलं आहे. तिला खूप दुख सहन करावं लागलं. पण आज ही अभिनेत्री अतिशय लोकप्रिय आहे.
ही अभिनेत्री आहे खुशी शाह, जी गुजराती चित्रपटांमध्ये एक सुप्रसिद्ध नाव आहे. तिने अगदी लहान वयात आपल्या आईला गमावले. एका अपघातात तिच्या आईचं निधन झालं. वडिलांनीही मुलीसाठी दुसरं लग्न केलं नाही. आपलं सर्वस्व मुलीवर अर्पण केलं.
पण एके दिवस नशिबाने तिला असा काळ दाखवला ज्यात तिच्याकडून सर्वकाही हिरावून घेतलं. 'जोश टॉक' ला दिलेल्या मुलाखतीत खुशी शाहने सांगितलं की, एके दिवशी तिच्या वडिलांचा अपघात झाला.
रुग्णालयाने उपचारासाठी 60 हजार रुपये मागितले. नातेवाईक असो वा शेजारी, कोणीही मदत केली नाही आणि हृदयविकाराच्या झटक्याने तिच्या वडिलांचं निधन झालं.
वडिलांचे तेरावेही झाली नाही तर इतर कुटुंबानीयांनी तिला अनाथाश्रमात पाठवलं. एका रात्रीत सर्वकाही बदललं. तिने सांगतले की, अनाथाश्रमातील शिक्षकांनी तिला मदत केली आणि ती बारावी पास झाली.
खुशी शाहने एक किस्सा शेअर केला होता. एका प्रसिद्ध मालिकेचे नावाजलेले दिग्दर्शक होते, ज्यांनी कामाच्या बदल्यात फेवर मागितलं. दिग्दर्शकाने अभिनेत्रीला सांगितलं की, जर इथे काम करायचं असेल तर हे सगळं करावंच लागेल.
अभिनेत्रीने स्पष्ट नकार दिला तेव्हा दिग्दर्शकाने तिला धमकी दिली होती की, तिला इंडस्ट्रीत टिकू देणार नाहीत. पण खुशी शाहने हार मानली नाही आणि ती सतत काम करत राहिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List