‘छावा’ सिनेमामुळे इतिहास कळाला हे दुर्दैव; भाजप नेत्याने व्यक्त केली खंत
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ हा सिनेमा विशेष गाजला. संपूर्ण देशात सिनेमाने तुफान कमाई केली. या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा दाखवण्यात आली आहे. आता भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत बोलताना खंत व्यक्त केली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगलीमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात छावा सिनेमामुळे इतिहास समजायला लागला याचे मला दु:ख होते असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, ‘छावा सिनेमामुळे इतिहास समजला हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या पिढीला सिनेमामधून इतिहास कळतोय. छत्रपती महाराजांचे अनेक किस्से आहेत. ते आत्ताच्या पिढीला माहीत नाहीत.’
वाचा: ‘… तर मी इंग्लंडला निघून जाईन’ भारत-पाक युद्धावर पाकिस्तानी नेत्याची मजेशीर प्रतिक्रिया
पुढे शिवेंद्रराजे यांनी टीका करत म्हटले, ‘आज या महाराष्ट्राची धुरा एक जानता नेता देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. असे नेते महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यात हवे आहेत. त्याचे नेतृत्व राज्याचे आहे आणि आत्तापर्यंत झालेले नेते आपापल्या विभागापुरते मर्यादित होते.’
महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपतींसारखे शासन स्वराज्याची निर्मिती झाली पाहिजे आपण म्हणतो. हे कार्य आपणाला करायचे आहे. प्रायव्हसी हा विषय फार घातक आहे. आपण जे बोलतो ते मोबाईलमध्ये सेव होते. कायदा कडक झाला पाहिजे. कोण कुठेही बसून काही टाकू शकतो. समाजामध्ये तेढ निर्माण करू शकतो. कारक कोणीही काहीही टाकतो असे ते पुढे म्हणाले.
छावा सिनेमाविषयी
छावा हा सिनेमा मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात संभाजीची भूमिका विक्की कौशलने साकारली होती आणि त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List