मी सती – सावित्री नाही, तारुण्यात सर्व काही…, गोविंदाच्या बायकोचा धक्कादायक खुलासा
अभिनेता गोविंदाने करिअरच्या शिखरावर असताना सुनीता अहुजाशी लग्न केलं होतं. पण लग्नाचं वृत्त त्याने बराच काळ सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. दरम्यान एका मुलाखतीत सुनीता गोविंदासोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. शिवाय लग्नानंतर आयुष्यात झालेल्या बदलांवर देखील सुनीताने सांगितलं नाही. ‘मी कोणती सती – सावित्री नाही. तारुण्यात मी देखील सर्व काही केलं आहे…’ असं सुनीता म्हणाली. सुनीता कायम तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
खासगी आयुष्यात बद्दल मुलाखतीत सुनीताने सांगितल्यानुसार, ‘लहानपणापासून गोविंदा आणि मी एकमेकांवर प्रेम करत होतो. लहानपणीचं प्रेम प्रचंड निरागस असतं. वयाच्या 15 व्या वर्षी आमची भेट झाली. त्यानंतर लग्न झालं. तेव्हा अशी होती, की मला जे सांगितलं जाईल ते मी करेल… प्रत्येक गोष्टीवर माझा होकार असायचा…’
‘पण आयुष्यात हळू हळू बदल होऊ लागले. एक वय असतं सगळ्या गोष्टी करण्याचं. मी देखील मित्रांसोबत फिरायचे. पार्टी करायची. आयुष्यात प्रचंड धम्माल केली आहे. पण एक वेळी अशी येते जेव्हा तुम्ही जबाबदार होता. पूजा – पाठ करा. मुलांची काळजी घ्या… त्यांना वेळ द्या.’
‘मी असं नाही म्हणत की मी सती – सावित्री आहे. मी सुद्धा आयुष्यात सर्व काही केलं आहे. पार्ट्या केल्या आहेत. क्लबमध्ये गेली आहे. पण प्रत्येक गोष्टीसाठी एक वय असते. आता ते सर्व नाही करु शकत . आता मी 54 वर्षांची आहे. आता मला देवाची पूजा करायला आवडतं.’
‘मी आता कोणासमोर झुकत नाही. देवाला सोडलं तर जगात मी कोणाच्या बापाला नाही घाबरत.’ असं देखील सुनीता एका मुलाखतीत म्हणाली होती. सुनीला आणि गोविंदाने 11 मार्च 1987 रोजी लग्न केलं. या दोघांना टिना ही मुलगी आणि यशवर्धन हा मुलगा आहे.
गोविंदा याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता आता बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसला तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. एक काळ असा होता जेव्हा गोविंदाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List