Donald Trump युद्ध काय करता, व्यापार करुया; माझ्या पर्यायाने हिंदुस्थान-पाकिस्तान खुश, ट्रम्प पुन्हा बोलले
मी मध्यस्थी केली म्हणून हिंदुस्थान पाकिस्तानमधील युद्ध थांबले, असा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे. ”मी हे नाही म्हणालो की मी मध्यस्थी केली. मी समस्या सोडवायला मदत केली असे म्हणालेलो’, अशा शब्दात त्यांनी यूटर्न घेतला. पण व्यापाऱ्याच्या मुद्द्याचा त्यांनी यावेळीही पुनरुच्चार केला आहे. ‘मी दोन्ही देशांना सांगितले की युद्ध काय करता, व्यापार करूया; माझ्या पर्यायाने पाकिस्तान व हिंदुस्थान दोघेही खूष झाले”, असे ट्रम्प यांनी कतारमध्ये एका कार्यक्रमात सांगितले.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या युद्धविराम व व्यापार या विधानावर ठाम राहिले आहेत. ”हिंदुस्थान पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडत चालली होती. ते एकमेकांवर क्षेपणास्त्राचा मारा करत होतो. मी त्यांना म्हणालो की युद्ध काय करता व्यापार करूया. त्यावर पाकिस्तान खूष झाला, हिंदुस्थानही खूष झाला. ते गेली अनेक वर्ष भांडत आहेत पण मी ते मिटवलं. मी काहीही सेटल करू शकतो. असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List