अजून लिहिलं असतं तर हाहा:कार माजला असता… संजय राऊत यांचा सूचक इशारा

अजून लिहिलं असतं तर हाहा:कार माजला असता… संजय राऊत यांचा सूचक इशारा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं बहुचर्चित ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून त्यामध्ये राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह या दोघांना मदत केली, असे राऊतांनी या पुस्तकात लिहीलं आहे. राऊत यांची ईडी कोठडी आणि तुरूंगातले दिवस , तेथील एकूण अनुभवाबद्दल हे पुस्तक असून त्यांच्या नवनव्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. उपकाराची जाणीवर न ठेवता मोदी शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फेोडला, माणंसही फोडली असा आरोप राऊतांनी केला. मी जे लिहीलं त्यापेक्षाही जास्त लिहू शकलो असतो, त्याने हाहा:कार माजला असता असा सूचक इशाराही राऊतांनी केला.

या पेक्षाही जास्त मी लिहू शकलो असतो पण..

शरद पवार असतील, बाळासाहेब असतील या महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेत्यांचा मदत करण्याचा जो स्वभाव आहे, त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही नेत्यांचे पक्ष कसे फोडले आणि माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा अट्टाहास केला, हा वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला. म्हणजे उपकाराची फेड ही कशी अपकाराने केली, आता हे भाजपवाल्यांचं ऐकत होतं. त्यांना काय माहीत आहे? तुम्ही कुठे होता तेव्हा? हा बोलतोय, तो बोलतोय, पोकळ दावे… अरे तुम्हाला काय माहीत आहे? जाऊन पवार साहेबांना भेटा आज. आणि त्यांच्याशी बोला, असं राऊत म्हणाले.

मी पुस्तकात लिहीलेल्या दोन्ही घटना 100 टक्के सत्य आहेत. मी त्यापेक्षाही जास्त लिहू शकलो असतो, पण त्याने फार हाहा:कार माजला असता. पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्याने मी मर्यादा पाळल्या आणि संयम पाळल्याचे राऊतांनी नमूद केलं. या पेक्षा असंख्य घटनांचा मी साक्षीदार आहे. तुम्हा सर्वांना हे नाकारता येणार नाही, मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांसोबत राहिलेला माणूस आहे. त्यामुळे यांना (मोदी-शाह) अनेकवेळा बाळासाहेबांनी केलेली मदत आणि घडामोडींचा मी एकमेव साक्षीदार आहे. पण मी त्या कधीच लिहिणार नाही. नरकातला स्वर्ग वेगळा प्रवास आहे. तुरुंग आहे. जेव्हा आपण तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो, राज ठाकरेंच्या भाषेत एकांतात जेव्हा आपण तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो, तेव्हा अनेक गोष्टी तुरुंगातील भिंतीशी बोलताना जुने संदर्भ आठवतात. त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो. घाबरून पळून जावे लागत नाही असा टोलाही राऊत यांनी हाणला.

अमित शाह यांना बाळासाहेबांची मदत

मात्र राऊतांच्या या दाव्यामुळे भाजपचे नेते चांगलेच संतापले आहेत. संजय राऊत कसा माणूस आहे सर्वांना माहित आहे, त्यांनी पुस्तकात काय लिहीलं त्याला फार महत्वे देण्याची गरज नाही असं म्हणत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राऊतांवर टीका केली. इतर नेत्यांनीही राऊतांवर टीकास्त्र सोडलंय.

पण यासर्वांचा समाचार घेत राऊत यांनी त्यांनाही प्रत्युत्तर दिलं. ” भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना माहीत नाही. राज्यातील भाजपचे जे नेते बोलत आहेत, त्यांना काहीच माहीत नाही. या विषयाला आता 25 वर्ष झाली आहेत. मी पुस्तकात लहानसा संदर्भ दिला आहे. पुस्तक मोठं आहे. संपूर्ण पुस्तक वाचा. तुम्ही फक्त अमित शाह, बाळासाहेब ठाकरे यात गुंतून बसू नका. ” असं राऊत म्हणालेत.

‘ मोदींनी शरद पवार यांच्याशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली हे मला माहीत आहे. वारंवार. मेरा खास आदमी है, आप मदत करो. तेव्हा अमित शाह फार कुणाला माहीत नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार यांनी विचारलं ये कौन आदमी है? आप बारबार मुझे फोन कर रहे हो, कौन है ये आदमी? मेरे लिए बहोत काम का आदमी है”, असं मोदींनी सांगितल्याचं राऊत म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुजरात समाचारचे मालक बाहुबली शाह यांना ईडीने घेतले ताब्यात गुजरात समाचारचे मालक बाहुबली शाह यांना ईडीने घेतले ताब्यात
गुजरातमधील वृत्तपत्र गुजरात समाचारचे मालक बाहुबली शाह यांना ईडीने ताब्यात घेतेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाहुबली शाह यांची चौकशी सुरू...
सुरक्षा दलाच्या छावणीवर वीज कोसळली, सीआरपीएफच्या एका जवानाचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी
भाजपमध्ये फितुरांचं रक्त, मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचा घणाघात
Jammu Kashmir – बडगाममध्ये लश्कर-ए-तोयबाशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक
लबाडांनो पाणी द्या… आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून निघाला शिवसेनेचा विराट मोर्चा
पुनर्विकासात बिल्डर्सच्या निवड प्रक्रीयेतून निबंधकांना हटवावे, मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी
Photo – कान्स में खिला ‘फूल’… नितांशीचा लूक पाहून चाहते घायाळ