मानसिक थकव्यामुळेच निवृत्त, विराट कोहलीबाबत रवी शास्त्री यांचे मत

मानसिक थकव्यामुळेच निवृत्त, विराट कोहलीबाबत रवी शास्त्री यांचे मत

विराट कोहलीची फिटनेस पाहता त्याची अजून दोन-तीन वर्षे सहज कसोटी खेळण्याची क्षमता दिसत होती. पण त्याच्या अचानक निवृत्तीमुळे आपणही हैराण झाल्याची भावना व्यक्त करत तो सातत्याने सार्वजनिक टीकांमुळे मानसिकरीत्या थकला होता. त्यामुळेच त्याने आपल्या जबरदस्त कसोटी कारकीर्दीचा अंत केल्याचे मत माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

कसोटीतून निवृत्त होण्याच्या एक आठवडा आधी माझे विराटशी बोलणे झाले होते. त्याचे विचार अत्यंत स्पष्ट होते. त्याच्यात अजूनही खूप कसोटी क्रिकेट बाकी होते, परंतु मानसिक थकवा व्यक्तीच्या शरीराला प्रभावित करतो. तो शारीरिकदृष्टय़ा जबरदस्त फिट आहे, मात्र मानसिक थकव्याने त्याला निवृत्तीचा निर्णय घेण्यास भाग पाडल्याचे मत शास्त्री यांनी बोलून दाखवले. विराटचे आकर्षक व्यक्तित्त्व आणि सातत्याने चर्चेत राहण्यामुळे तो बर्नआऊट झाल्याचे ते म्हणाले. कोहलीने गेल्या दशकभरात जगभरातील आपल्या चाहत्यांना प्रेरित केले आणि क्रिकेटविश्वातील अन्य क्रिकेटपटूंपेक्षा सर्वाधिक लोकप्रियताही मिळवली. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 68 पैकी 40 कसोटी सामन्यांत विजय मिळवलेत. तो हिंदुस्थानचा सर्वात यशस्वी कर्णधारही आहे. माझी विराटबरोबर जमलेली प्रशिक्षक-कर्णधार ही हिंदुस्थानी कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी जोडी असल्याचेही शास्त्राr यांनी आवर्जून सांगितले. तो नेहमीच आपल्या प्रत्येक गोष्टीला शतप्रतिशत योगदान द्यायचा. मग ती फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण किंवा नेतृत्व. अनेक पातळय़ांवर प्रचंड सक्रिय असल्यामुळे तो बर्नआऊट झाला असावा, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आणा याचमुळे त्याला निवृत्तीचा निर्णय घेण्यास भाग पाडल्याची भीती त्यांनी बोलून दाखवली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुजरात समाचारचे मालक बाहुबली शाह यांना ईडीने घेतले ताब्यात गुजरात समाचारचे मालक बाहुबली शाह यांना ईडीने घेतले ताब्यात
गुजरातमधील वृत्तपत्र गुजरात समाचारचे मालक बाहुबली शाह यांना ईडीने ताब्यात घेतेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाहुबली शाह यांची चौकशी सुरू...
सुरक्षा दलाच्या छावणीवर वीज कोसळली, सीआरपीएफच्या एका जवानाचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी
भाजपमध्ये फितुरांचं रक्त, मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचा घणाघात
Jammu Kashmir – बडगाममध्ये लश्कर-ए-तोयबाशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक
लबाडांनो पाणी द्या… आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून निघाला शिवसेनेचा विराट मोर्चा
पुनर्विकासात बिल्डर्सच्या निवड प्रक्रीयेतून निबंधकांना हटवावे, मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी
Photo – कान्स में खिला ‘फूल’… नितांशीचा लूक पाहून चाहते घायाळ