भोपाळमध्ये मॉक ड्रिलदरम्यान ग्रेनेडचा स्फोट, दोन पोलीस गंभीर जखमी
भोपाळमध्ये गुरुवारी मॉक ड्रिलदरम्यान ग्रेनेडचा स्फोट झाल्याने दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना तात्काळ उपचारासाठी बंसल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशाल सिंह आणि संतोष कुमार अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.
भोपाळमध्ये गुरुवारी पंचवीसव्या बटालियनकडून एक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान अचानक ग्रेनेडचा स्फोट झाल्याने दोन पोलीस गंभीर जखमी झाले. जखमी पोलिसांमध्ये एक हेड कॉन्स्टेबल आणि एका कॉन्स्टेबलचा समावेश आहे.सध्या त्यांच्यावर आपत्कालीन कक्षात उपचार सुरू आहेत.
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर शहरात हे मॉक ड्रिल घेण्यात आले. सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी पोलीस सतत मॉक ड्रिल करत आहेत. पोलीस अधिकारीही रुग्णालयात उपस्थित आहेत आणि घटनेची चौकशी करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List