दीपिकाला गंभीर आजाराने परत घेरलं, नवऱ्याने दिली हेल्थ अपडेट, चाहत्यांकडून चिंता व्यक्त
चाहत्यांमध्ये कायम सेलिब्रिटींच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगलेली असते. दरम्यान प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर हिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अभिनेत्रीला एका गंभीर आजाराने घेरलं आहे. दीपिकाच्या प्रकृतीची माहिती अभिनेता आणि पती शोएब इब्राहिम याने युट्यूबच्या माध्यमातून दिली आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या पोटात तिव्र वेदना होत होत्या. सुरुवातील एसिडिटी समजून घरगुती उपचार केले. पण वेदना कमी होत नसल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याची माहिती शोएब याने दिली.
शोएब पुढे म्हणाला, ‘डॉक्टरांनी सांगितल्यानुसार दीपिकाच्या यकृताच्या डाव्या भागात टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आहे. अशात डॉक्टरांनी दीपिका तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. ट्यूमर कॅन्सरचा आहे की काय याची भीती देखील आम्हाला होती… ‘
‘पण ट्यूमर कॅन्सरचा नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पण अद्याप काही चाचण्या करायच्या आहेत…’ असं देखील अभिनेता म्हणाला. ‘ट्यूमर नक्की कसलं आहे यावर अद्याप काहीही कळू शकलेलं नाही. दीपिका गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात होती आणि गुरुवारी म्हणजे 15 मे रोजी तिला डिस्चार्ज मिळाला आहे.’
‘दीपिकाच्या ट्यूमरवर उपचार शस्त्रक्रिया झाल्यानंतरच होऊ शकतो. त्यामुळे दीपिकावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येईल. शुक्रवारी यकृत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर पुढच्या उपचाराचा दिशा ठरता येईल. डॉक्टरांनी दीपिकाला रुग्णालयात राहण्याचा सल्ली दिलेला. पण रुग्णालयातील वातावरण आणि घरातील वातावरण फार वेगळं असतं.’
आतापर्यंत दीपिकाच्या चाचण्यांमध्ये कर्करोगाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, परंतु तरीही याबाबत आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. या रक्त तपासणीचे रिपोर्ट शुक्रवारी येणार आहे, कुटुंब देखील चिंतेत आहे. या कठीण काळात शोएब इब्राहिमने त्याच्या चाहत्यांना दीपिकासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. दीपिकासाठी प्रार्थना करा आणि सर्व नकारात्मक विचार बाजूला ठेवा आणि तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा… असं देखील इब्राहिम म्हणाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List