सैफ अली खानच्या संपत्तीचं पाकिस्तानशी खास कनेक्शन, झाली मोठी कारवाई
Saif Ali Khan Property: अभिनेता सैफ अली खान याच्या तीन मालमत्तेबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. अभिनेत्याच्या या तिन्ही मालमत्ता शत्रू मालमत्तेअंतर्गत येत असल्याची माहिती समोर येता आहे. भोपाळ, साहोर आणि रायसेन याठिकाणी असलेल्या मालमत्ता शत्रू मालमत्तेअंतर्गत येत आहेत. गृह मंत्रालयाच्या शत्रू संपत्तीच्या संरक्षकाने (CEPI) 8 मे 2025 रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नवाब हमीदुल्ला खान यांच्या मुली आबिदा आणि आफताब बेगम पाकिस्तानच्या नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या मालकीच्या मालमत्ता शत्रू मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
अभिनेत्याच्या मालमत्तेची माहिती समाजसेवी अमिताभ अग्निहोत्री यांनी तक्रार दाखल केल्यानंतर दिली आहे. आता याप्रकरणी तपास सुरु आहे. 1949 च्या मर्जर एग्रीमेंटची प्रत नवाब कुटुंबाकडून मागवण्यात यावी आणि जर ती सादर केली नाही तर मालमत्ता जप्त करण्यात याव्यात अशी मागणी अग्निहोत्री यांनी केली आहे.
उच्च न्यायालयात सादर केलेल्या माला श्रीवास्तव यांच्या अहवालानुसार, भोपाळ आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील सुमारे 550 एकर जमीन नवाब कुटुंबाच्या नावावर नोंदणीकृत होती, जी वैयक्तिक मालमत्ता नव्हती. सध्या अभिनेत्याच्या मालमत्तेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
MHA च्या रिपोर्टनुसार, भारतात पाकिस्तानच्या तब्बल 12 हजारी 983 मालमत्ता आहे. ज्या सर्व शत्रू मालमत्तेअंतर्गत येतात. या मालमत्ता शत्रू मालमत्तेच्या संरक्षक, CEPI कडे आहेत. यापैकी बहुतेक मालमत्ता उत्तर प्रदेश (5688) आणि पश्चिम बंगाल (4354) मध्ये आहेत.
शत्रू मालमत्ता म्हणजे काय?
शत्रू मालमत्ता म्हणजे अशा लोकांची मालमत्ता जे भारतातून पाकिस्तान किंवा चीनमध्ये स्थलांतरित झाले आणि ज्यांची मालमत्ता भारतात मागे राहिली. भारत सरकारने या मालमत्तांना शत्रू मालमत्ता म्हणून घोषित केलंलं. शिवाय त्या CEPI च्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्या आहेत.
1968 च्या शत्रू मालमत्ता कायद्यानुसार, मूळ मालक किंवा त्याच्या वारसांना शत्रू मालमत्ता हस्तांतरित करता येत नाही किंवा परत मिळवता येत नाही. जरी शत्रूने किंवा त्याच्या वारसांनी त्यांचे नागरिकत्व बदललं असेल तरी देखील त्यांनी जमीनीचा मालकी हक्क मिळवता येत नाही.
2017 मध्ये शत्रू मालमत्ता कायद्यात केलेल्या दुरुस्तीनंतर, भारतीय नागरिक असलेल्या कायदेशीर वारसांना शत्रू मालमत्तांवर कोणताही दावा नाही आणि त्यांच्या विल्हेवाटीवर त्यांना भरपाई मिळण्यास पात्र नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List