रिसॉर्टमधील तंबू कोसळून पर्यटक तरुणीचा मृत्यू, तीन जण जखमी

रिसॉर्टमधील तंबू कोसळून पर्यटक तरुणीचा मृत्यू, तीन जण जखमी

रात्रीच्या सुमारास लाकडी तंबू अंगावर कोसळल्याने एका पर्यटक तरुणीचा मृत्यू झाला असून, तीन पर्यटक जखमी झाले आहेत. केरळमधील वायनाडमध्ये बुधवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. निशमा असे मयत तरुणीचे नाव असून ती मलप्पुरम येथील रहिवासी आहे. जखमी पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी 900 कांडी येथे एका रिसॉर्टमध्ये ही घटना घडली. हे एक प्रमुख इको-टुरिझम डेस्टिनेशन आहे. लाकडी खांब आणि सुकलेल्या गवतापासून हा तंबू बनवण्यात आला होता. या तंबूत चार पर्यटक होते. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा तंबू अचानक कोसळल्याने ही घटना घडली. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

घटनेनंतर रिसॉर्टमधील तंबूची सुरक्षा मानके तपासली जात आहेत. प्रशासनाने रिसॉर्टमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बुडत्या ‘पीसीबी’ला ‘आयसीसी’चा काडीचा आधार बुडत्या ‘पीसीबी’ला ‘आयसीसी’चा काडीचा आधार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी (डब्ल्यूटीसी) बक्षिसांची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला 30.69 कोटी तर उपविजेत्या...
पाणी पिऊनही घसा कोरडाच राहतो? सतत तहान लागण्यामागे असू शकते हे कारण
सरन्यायधीश भूषण गवई यांचा पहिल्याचा खटल्यात नारायण राणेंना दणका, वनविभागाची जमीन बिल्डरला देण्याच्या निर्णय केला रद्द
न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुनील तटकरेंचे एक घाव दोन तुकडे, स्पष्टच सांगितलं..
लग्न, फसवणुक आणि षडयंत्र; इंटीमेट सीन्सचा भडीमार आहे या सिनेमांमध्ये
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल