आई विनवण्या करत होती शरण जा, त्याने ऐकलं नाही; त्राल चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचा व्हिडिओ व्हायरल

आई विनवण्या करत होती शरण जा, त्याने ऐकलं नाही; त्राल चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचा व्हिडिओ व्हायरल

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्काराने जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान पुलवामा येथील त्राल भागात झालेल्या चकमकीत लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. त्रालमध्ये ठार झालेल्या एका दहशतवाद्याने चकमकीपूर्वी व्हिडिओ कॉलिंगद्वारे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने सैन्याला आव्हान दिले. ‘सेना येऊ दे, मी बघतो’, असे दहशतवादी आमिर त्याच्या आईला म्हणाला.

दहशतवादी आमिरचा कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलवर बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आमिर त्याच्या आईशी बोलताना दिसत आहे. त्याची आई त्याला शरण येण्यास सांगत आहे, पण आमिर म्हणतो की सैन्याला पुढे येऊ दे मग मी बघतो. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते, मात्र त्यांनी आत्मसमर्पण करण्याऐवजी सुरक्षा दलावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर दिले आणि चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले.

व्हिडिओ कॉलमध्ये काय म्हणाला आमिर?

व्हिडिओ कॉलमध्ये आमिर म्हणतोय की, “मी त्यांना सांगितले की पुढे या”. मग एक महिला विचारते की माझा भाऊ कुठे आहे. मग आमिर म्हणतो की त्यांना (सेना) पुढे येण्यास भीती वाटते. शेवटी, एका महिला म्हणते, “काळजी करू नकोस, अल्लाह तुझी काळजी घेईल.” आमिरच्या आईने त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र त्याने नकार दिला. त्यानंतर उमरची बहीण आमिरशी बोलताना दिसते.

आमिरच्या हातात एके-47 रायफल

ज्या घरातून लष्कराला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्याच घरातून आमिर बोलत होता. व्हिडिओ कॉलवर बोलत असताना, आमिरच्या हातात एके-47 रायफल देखील दिसत आहे. सुरक्षा दलांना या लोकांनी आत्मसमर्पण करावे असे वाटत होते पण त्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला, म्हणून त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागले आणि चकमकीत हे दहशतवादी मारले गेले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;