Skin Care- महागडी क्लिंजर्स वापरण्यापेक्षा व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये हे मिसळा, चेहऱ्यावर येईल अनोखा ग्लो
व्हिटॅमिन ई केवळ हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप महत्वाचे आहे. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे. यामुळे त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते. हे त्वचेवरील डाग दूर करते. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. यामुळे त्वचा मऊ आणि कोमल होते. हे त्वचेवरील डाग दूर करते. व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. म्हणूनच आपण व्हिटॅमिन ई कॅप्सूलच्या वापराने आपला चेहरा स्वच्छ करु शकतो. तसेच या कॅप्सूलमध्ये काय घातल्यास आपला चेहरा चमकदार होईल हे जाणून घेऊया.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोरफड
आपण कोरफडीचा गर व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये मिसळून आपला चेहरा स्वच्छ करू शकतो. यासाठी 2 चमचे एलोवेरा जेल घ्या आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधून तेल काढून ते मिसळा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि थोडा वेळ मसाज करा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. कोरफडीमुळे त्वचेवर साचलेली सर्व धूळ आणि घाण सहज निघून जाईल. ते त्वचेची चमक वाढवते. यामुळे त्वचाही चमकदार दिसते.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि गुलाबजल
गुलाबपाणी व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये मिसळूनही चेहरा स्वच्छ करता येतो. 2 चमचे गुलाबजल घ्या आणि त्यात 2-3 कॅप्सूलचे तेल मिसळा. आता ते संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण वाढेल आणि त्वचा स्वच्छ दिसेल. गुलाबपाणी क्लिंजर म्हणून काम करते. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होईल आणि उघडी छिद्रेदेखील बंद होतील. तसेच मुरुमं आणि चेहऱ्यावर येणाऱ्या फोडांनाही प्रतिबंध होईल.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि ग्लिसरीन
त्वचा सामान्य असल्यास, व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये ग्लिसरीन मिसळावे. यामुळे आपला चेहरा चांगला स्वच्छ होईल. ग्लिसरीन चेहऱ्यावर अडकलेली सर्व घाण आणि प्रदूषणाचे कण काढून टाकते. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. अर्धा चमचा ग्लिसरीन घेऊन त्यामध्ये 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल मिसळून, चेहऱ्याला मसाज करावा. मसाज केल्यानंतर रात्रभर चेहरा धुवू नये. त्यानंतर सकाळी साध्या पाण्याने चेहरा धुवावा.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि हळद
चेहऱ्यावर डाग असतील तर, व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये हळद मिसळून चेहरा स्वच्छ करू शकता. हळदीमध्ये असलेले करक्यूमिन गुणधर्म त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते. हळद त्वचेला उजळवते आणि रंग सुधारते. यासाठी 2-3 व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधून तेल काढा. त्यात चिमूटभर हळद घाला. ते चेहऱ्यावर लावा आणि 1-2 मिनिटे मसाज करा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. जास्त वेळ चेहऱ्यावर हळद लावू नका. यामुळे जळजळ आणि चिडचिड होऊ शकते.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि मुलतानी माती
व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि मुलतानी मातीनेही चेहरा स्वच्छ करता येतो. 1 2 चमचे मुलतानी माती घ्या. त्यात गुलाबजल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल तेल मिसळा. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. पेस्ट सुकल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवा. तुमची त्वचा तेलकट असेल तर, या पेस्टने तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List