सरन्यायधीश भूषण गवई यांचा पहिल्याचा खटल्यात नारायण राणेंना दणका, वनविभागाची जमीन बिल्डरला देण्याच्या निर्णय केला रद्द
सरन्यायधीश भूषण गवई यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर दिलेल्या पहिल्या निकालातच भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोरदार दणका दिला आहे. 1998 साली नारायण राणे महसूल मंत्री असताना त्यांनी वन विभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा नारायण राणेंचा निर्णय सरन्यायधीशांनी रद्द करून ती जमीन पुन्हा वनविभागाला देण्याचे आदेश दिले आहेत.
नारायण राणे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील कोंढवा येथील वन विभागाची 30 एकर जागा रिची रिच सोसायटीसाठी बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List