सलमान खान नाही ‘या’ सुपरस्टारसोबत बच्चन कुटुंबाचा ३६ चा आकडा, नाही पाहत एकमेकांचं तोंड
Bachchan Family: महानायक अमिताभ बच्चन यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. बच्चन कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास चाहते कायम उत्सुक असतात. सध्या बच्चन कुटुंबाच्या शत्रूची चर्चा रंगली आहे. अनेकांना वाटत असेल की, अभिनेता सलमान खान बच्चन कुटुंबाचा मोठा शत्रू असेल. पण असं नाही. सलमान खान नाही तर, प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यासोबत बच्चन कुटुंबियांचा ३६ चा आकडा आहे. अभिनेत्यासोबत अमिताभ बच्चन यांनी फक्त एकच सिनेमा केला, त्यानंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत.
सांगायचं झालं तर, अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने देखील अभिनेत्यासोबत एकाच सिनेमात काम केलं. त्यानंतर दोघे कधीच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत. पण अमिताभ बच्चन यांनी या सुपरस्टारच्या वडिलांसोबत एक सिनेमा केला होता. जो हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात हीट सिनेमा ठरला. सलमान खानने बिग बींसोबत बागबान आणि गॉड तुस्सी ग्रेट हो सारख्या सिनेमात काम केलं आणि ऐश्वर्यासोबत सलमानने हम दिल दे चुके सनम सिनेमात काम केलं
कोण आहे ‘तो’ सुपरस्टार…
सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, ‘तारा सिंग’ सनी देओल आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंसानियत’ अमिताभ बच्चन आणि सनी देओल यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘इंसानियत’ सिनेमा दोघांचा पहिला आणि शेवटचा सिनेमा ठरला.
रिपोर्टनुसार, तेव्हा चाहत्यांमध्ये सनी देओल यांची क्रेझ वाढत होती. ज्यामुळे आपलं करीयर धोक्यात येणार अशी भीती अमिताभ बच्चन यांना होती.
अशात ‘इंसानियत’ सिनेमातील स्वतःची भूमिका अमिताभ बच्चन यांनी वाढवून घेतला आणि सनी देओल यांना बाजूला केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. असं असताना देखील सनी यांनी शांत राहत बिग बी आणि त्यांच्या कुटुंबापासून स्वतःला लांब केलं.
बिग बी यांच्यासोबत वाद सुरु असताना सनी यांनी तीन वर्षांनंतर ऐश्वर्या सोबत ‘इंडियन’ सिनेमातून स्क्रिन शेअर केली. पण सिनेमा कधी प्रदर्शित झालाच नाही. त्यामुळे सनी आणि ऐश्वर्या यांचं नात्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाला. सिनेमातील गाणी देखील शूट झाले होते. पण ऐश्वर्याने सनी याच्यासोबत काम करण्यास नकार दिला. त्यानंतर दोघे कोणत्यात सिनेमात एकत्र दिसले नाहीत.
सांगायचं झालं तर, जेपी दत्ता यांनी ‘बॉर्डर’ सिनेमात सनी देओल यांना कास्ट केलं, पण जेव्हा त्यांनी ‘एलओसी कारगिल’ सिनेमा बनवला तेव्हा त्यांनी सनीऐवजी अभिषेक बच्चनला कास्ट केले, ज्यामुळे सनी आणि जेपी दत्ता यांच्यात बराच काळ मतभेद होते. पण आता जेपी दत्ता यांनी बॉर्डर 2 मध्ये सनी देओलला कास्ट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List