अश्लीलता पसरवण्यापासून सेलिब्रिटींच्या घटस्फोटापर्यंत, जेव्हा माधुरी दीक्षित अडकली वादाच्या भोवऱ्यात

अश्लीलता पसरवण्यापासून सेलिब्रिटींच्या घटस्फोटापर्यंत, जेव्हा माधुरी दीक्षित अडकली वादाच्या भोवऱ्यात

Madhuri Dixit Birthday: बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज माधुरी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये अभिनेत्रीच्या अनेक चर्चा रंगत असतात. आज माधुरीचा वाढदिवस आहे. त्यामुळे माधुरीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेवू. ज्यामुळे माधुरी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली.

माधुरीच्या करीयरमधील एक गाणं असं आहे ज्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली. अभिनेत्रीवर अश्लीलता पसरवण्याचे आरोप करण्यात आले. संबंधित गाणं ‘खलनायक’ सिनेमातील ‘चोली के पिछे क्या है’ हे गाणं आहे. माधुरीवर चित्रित केलेल्या या गाण्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप होता. तेव्हा लोकांनी गाण्यावर बंदी घालण्याची आणि सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली होती. पण जेव्हा हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं तेव्हा त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचं सांगण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘चोली के पिछे क्या है’ गाणं आजही प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे.

सांगायचं झालं तर, ‘खलनायक’ सिनेमाला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सिनेमात माधुरी हिच्यासोबत संजय दत्त, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, राखी गुलजार, रम्या कृष्णा, सुष्मिता मुखर्जी, एके हंगल, नीना गुप्ता यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

माधुरी दीक्षितवर संसार मोडण्याचे आरोप

बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना माधुरीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. एवढंच नाहीतर, अभिनेत्री संसार मोडल्याचे देखील आरोप आहेत. अभिनेता संजय दत्त यांच्या वैवाहित आयुष्यात माधुरीमुळे संकट आलं… असं अनेकदा समोर आलं. संजूबाबाचं पहिलं लग्न ऋचा शर्मा हिच्यासोबत झालं होतं. तेव्हा माधुरी आणि संजय एकत्र सिनेमांमध्ये काम करत होते. अशात दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी देखील जोर धरला.

पण दोघांनी कधीच त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली नाही. रिपोर्टनुसार, विवाहित असताना देखील संजय माधुरीशी लग्न करू इच्छित होता. त्यावेळी संजयची पहिली पत्नी ऋचा शर्मा ब्रेन ट्यूमरवर उपचार घेत होती. लग्न वाचवण्यासाठी ऋचा अमेरिकेहून मुंबईत परतली. एका मुलाखतीदरम्यान, ऋचाने माधुरीला ‘घर तोडणारी’ आणि ‘विवाहित पुरूषाशी प्रेमसंबंध असलेली स्त्री’ असं म्हटलं होतं.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात संजय दत्तला अटक झाल्यानंतर, माधुरीने संजय दत्तसोबत असलेले सर्व संबंध मोडलं आणि 1999 भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर श्री राम माधव नेने यांच्यासोबत लग्न केलं. आज माधुरी पती नेने आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;