मोरासोबत पाकिस्तानी गाण्यावर थिरकली कंगना राणौत; युजर्सने ट्रोल करत म्हटलं ‘देशद्रोही’

मोरासोबत पाकिस्तानी गाण्यावर थिरकली कंगना राणौत; युजर्सने ट्रोल करत म्हटलं ‘देशद्रोही’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असते किंवा वादात असते. आताही एका व्हिडीओमुळे कंगना पुन्हा एकदा वादात सापडली आहे. नुकतेच तिच्या जयपूर टूरमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये, अभिनेत्री मोरासोबत नाचताना दिसली आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती झाडावरून आंबे तोडताना दिसली. अभिनेत्रीचे हे आरामदायी क्षण चित्रे आणि व्हिडिओंमध्ये पाहून चाहते आनंदी झाले. कंगनाला तिच्या स्टाईलबद्दल कौतुकही मिळालं. पण सोबतच कंगनाने मोराला पाहून थिरकतानाच्या व्हिडीओसाठी पाकिस्तानी गाणे वापरल्याबद्दल तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

पाकिस्तानी गाणे वापरल्याबद्दल कंगना ट्रोल झाली

कंगनाने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर पाकिस्तानी कलाकार जैन आणि जोहैब यांनी तयार केलेले गाणे वापरले आहे. सध्याच्या भारत-पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीमुळे आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी गाणे वापरल्याबद्दल कंगनाला ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओमध्ये कंगना मोरासोबत नाचताना दिसत आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये, ती झाडावरून आंबे पटकन तोडताना दिसली. ही पोस्ट शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जिवंत राहण्यासाठी फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे जीवन. आशा आहे की आपण फक्त जगत नाही आहोत, तर आपण जिवंत आणि उत्साही देखील आहोत.” पण या व्हिडीओमुळे तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया

कगंनाच्या या व्हिडीओवर नेटकरी संतापजनक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘देशद्रोही, पाकिस्तानी गाणे’, दुसऱ्या युजरने लिहिले, ‘हे पाकिस्तानी गाणे आहे दीदी’, तर एका युजरने कंगनाला प्रश्न केला आहे की, ‘तू पाकिस्तानी गाणे का वाजवले आहेस?’, दुसऱ्या युजरने लिहिले, ‘ती पाकिस्तानचा इतका द्वेष करते मग पाकिस्तानी गाणे का लावेल आहे?’ अशापद्धतीने कंगनाला सोशल माडियीवर चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. पण कंगनाने अद्याप तरी यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कंगनाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, कंगनाच्या चित्रपट कारकिर्दीत सतत फ्लॉप चित्रपट येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही अभिनेत्री फक्त फ्लॉप चित्रपट देत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला तिचा ‘इमर्जन्सी’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. तथापि, तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अभिनेत्रीला खूप कौतुक मिळाले. पण चित्रपट खास कामगिरी करू शकला नाही.

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – बापरे! 40 कोटींचा ड्रेस, 1300 कोटींचे दागिने घालून कान्समध्ये पोहोचली उर्वशी Photo – बापरे! 40 कोटींचा ड्रेस, 1300 कोटींचे दागिने घालून कान्समध्ये पोहोचली उर्वशी
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही बुधवारी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या रेड कार्पेटवर झळकली. तिचा ड्रेस पाहून अनेकांच्या भुवया उंच...
अदानीने ओरबाडलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी मुंबईकरांना का पैसे भरायला लावताय? आदित्य ठाकरे यांचा सवाल
अभिनेत्री छाया कदम पोहोचली कान्सला, या ‘मराठी’ चित्रपटाचे उद्या होणार स्क्रिनिंग
Balochistan : पाकिस्तानचा तुकडा पडला, बलुचिस्तान आता स्वतंत्र देश; बलुच नेत्याने केली मोठी घोषणा
लातूरच्या पर्यटकाचा आग्र्यात मृत्यू, ताजमहल पहायला गेला असता चक्कर येऊन कोसळला
ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा आधीच कशी काय केली, पंतप्रधान मोदी गप्प का? काँग्रेसचा सवाल
Pune News – पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, भररस्त्यात तरुणावर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद