“माझ्या शारीरिक,मानसिक गरजा कमी झाल्या आहेत…”, प्राजक्ता माळी लग्नाबद्दल काय म्हणाली?
सध्या मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुण चर्चेत असते. सोशल मीडियावर प्राजक्ताची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्राजक्ताने लाखो लोकांच्या मनावर ती राज्य करते. प्राजक्ताच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायलाही आवडतं.
प्राजक्ताच्या चाहत्यांना लग्नाबाबत जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात
प्राजक्ता नेहमी तिच्या मुलाखतींमुळेही चर्चेत असते. ती कोणत्याही विषयावर बेधडकपणे तिचं मत मांडते. तसेच लग्नाबद्दल तिची मतं असतील. तिचं अफेअरच्या चर्चा असतील किंवा मग तिच्या अध्यात्माचा प्रवास असेल सर्वांबद्दलच ती नेहमी बेधडकपणे बोलताना दिसते. पण प्राजक्ताच्या चाहत्यांना लग्नाबाबत जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. अनेक मुलाखतींमध्ये प्राजक्ताला तु लग्न कधी करणार आहेस? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
प्राजक्ताने अनेक वेळा लग्नाच्या प्रश्नाचं उत्तर देण टाळलं आहे
मात्र, प्राजक्ताने अनेक वेळा या प्रश्नाचं उत्तर देण टाळलं. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताला पुन्हा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा प्राजक्ताने यावर मौन सोडलं आणि यावर ती म्हणली होती की, “डोक्याची मंडई होणार असेल आणि दु:खच आयुष्यात येणार असेल तर मी लग्न नाही करणार.”
“अध्यात्मामुळे तर माझ्या गरजा खूपच कमी झाल्या”
पुढे प्राजक्ता म्हणाली ,”मानसिक शांतता ही माझ्या आयुष्याची प्राथमिकता आहे. जर डोकंच जागेवर नसेल तर काम करायला सुचणार नाही. त्यामुळे मानसिक शांतता फार गरजेची आहे. अनेकदा सामाजिक, शारीरिक, मानसिक आर्थिक गरजांसाठी मुली लग्न करतात. पण माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत. अध्यात्मामुळे तर माझ्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत. हे सगळं जिथं संपतं तिथं प्रेम आणि विश्वासाच्या जीवावर ते नातं टिकतं. त्यामुळेच तसाच जोडीदार हवा, असं प्राजक्ता माळीने सांगितलं.
असं म्हणत प्राजक्ताने लग्नापासून ते तिच्या अध्यात्माच्या प्रवासापर्यंत सर्व गोष्टींवर तिने अनेक मुलाखतींमध्ये बिन्धास्तपणे बोलली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List