ग्लोबल वॉर्मिंगला एक टक्के श्रीमंत जबाबदार

ग्लोबल वॉर्मिंगला एक टक्के श्रीमंत जबाबदार

सध्याच्या काळात ग्लोबल वार्ंमग म्हणजे जागतिक तापमानवाढ ही अवघ्या विश्वासमोरची फार मोठी समस्या आहे. जागतिक तापमानवाढीला अनेक घटक जबाबदार आहेत. 1990 पासून ग्लोबल वॉर्मिंगला  एक टक्के श्रीमंत वर्ग जबाबदार असल्याचा अभ्यास ‘नेचर क्लायमेट चेंज’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. श्रीमंत लोकांच्या वापराचा आणि गुंतवणुकीचा जगाच्या हवामानावर कसा विपरीत परिणाम होता, यावर नव्या अभ्यासातून प्रकाश टाकण्यात आला आहे. 1990 पासून झालेल्या जागतिक तापमानवाढीपैकी एक पंचमांश तापमानवाढीला जगातील श्रीमंतांपैकी एक टक्के लोक जबाबदार आहेत, तर जागतिक तापमानवाढीच्या दोन तृतीयांश भागांसाठी दहा टक्के लोक जबाबदार आहेत, असे ‘नेचर क्लायमेंट चेंज’च्या अभ्यासात आढळून आले आहे. संशोधकांच्या मते, हवामान बदलाचा थेट संबंध उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक जीवनशैली आणि गुंतवणूक निवडींशी आहे.
तापमानातील बदल म्हणजे केवळ उत्सर्जनाशी संबंधित नसून थेट आपली जीवनशैली आणि गुंतवणूक पर्यायाशी म्हणजे संपत्तीशी संबंधित असल्याचे लेखिका सारा शोएनगार्ट यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;