पाकला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली? शस्त्रसंधीवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेला पाकिस्तान गेल्या चार दिवसांपासून हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला करत सुटला आहे. हे हल्ले हिंदुस्थानने परतवून लावत पाकिस्तानवर प्रतिहल्ला केला. दोन्ही देशातील तणाव वाढत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि शनिवारी सायंकाळी शस्त्रसंधीही झाली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सरकारवर हल्लाबोल करत पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना शस्त्रसंधी का केली? असा खणखणीत सवाल रविवारी सकाळी ते माध्यमांशी बोलताना केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असे सांगण्यात येतंय हे चुकीचे आहे. आपण व्हाईट हाऊसचे निवेदन, ट्रम्प यांचे एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंट पहाल तर त्यांच्या सूचनेवरून हिंदुस्थानने युद्धबंदी स्वीकारलेली आहे. आमची माणसं मेली आहेत, आमच्या 26 महिलांचे कुंकू पुसले गेले. त्यामुळे ट्रम्प यांचा संबंध काय? ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताहेत? हिंदुस्थान हे सार्वभौम, स्वतंत्र राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो. पण कोणत्या अटी-शर्तीवर? असा सवाल राऊत यांनी केला.
युक्रेन-रशिया युद्धावेळी भाजपने जाहीर केलेली की, पापा ने वॉर रुकवा दी. मग आता अमेरिकेच्या पापाने युद्ध थांबवले का? पुरा बदला लेंगे, पाकिस्तान के तुकडे करेंने अशी भाषा मोदींची होती. मग कुठे गेले ते तुकडे? जगात हिंदुस्थानची बेआब्रू झाली आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात आम्ही युद्ध जिंकले. भक्त, अंधभक्त कुठे आहेत? कोणत्या अटी-शर्तींवरक युद्धबंदी केली यासाठी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी. मोदींना पळ काढता येणार नाही. पाकिस्तानला कायमस्वरुपी धडा शिकवण्याची संधी असताना युद्धबंदीची, माघार घ्यायची गरज काय?
आमची माणसं मेली आहेत, आमच्या 26 महिलांचे कुंकू पुसले गेले. त्यामुळे ट्रम्प यांचा संबंध काय? – संजय राऊत
वाचा सविस्तर – https://t.co/cQIjO9pPx3 pic.twitter.com/9sgWTeAoe9— Saamana Online (@SaamanaOnline) May 11, 2025
हिंदुस्थानी सैन्याचे मनोबल प्रचंड उंचावलेले असताना देशाच्या राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली आणि सैन्याचे, देशाचे मनोबल उद्ध्वस्त केले. कोणसाठी तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी. एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा ट्रम्प यांना अधिकार काय? 26/11 हल्ला झाला तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मोदी यूनोमध्ये गेले होते आणि सांगत होते की, ओबामा के पास जा कर रो रहै है… आता मोदी ट्रम्पकडे जाऊन रडताहेत का? खरे तर हा देशाच्या हुतात्म्यांचा, कुंकू पुसले गेलेल्या भगिनींच्या त्यागाचा अपमान आहे. या क्षणी माघार घ्यायची गरज नव्हती, असे राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List