‘दुबई चॉकलेट’च्या ट्रेंडने जगात पिस्त्याची टंचाई, सोशल मीडियावरील ट्रेंड पडतोय भारी

‘दुबई चॉकलेट’च्या ट्रेंडने जगात पिस्त्याची टंचाई, सोशल मीडियावरील ट्रेंड पडतोय भारी

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि जगभरातील लोकांपर्यंत पोचेल सांगता येत नाही. सोशल मीडियावर खाद्यपदार्थांचा ट्रेंडही मोठ्या प्रमाणात असतो. या ट्रेंडमध्ये लोक वाहवत जातात आणि ते पदार्थ खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये पोचतात. या अशाच ट्रेंडमुळे सध्या जगभरातील मार्केटमध्ये वस्तूंची टंचाई जाणवत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, ‘दुबई चॉकलेट’चा ट्रेंड गेल्या वर्षभरापासून टिकटॉकवर आहे. परिणामी दुबई चॉकलेटची जोरदार विक्री होतेय. यामुळे जगभरातील मार्केटमध्ये पिस्त्याची टंचाई निर्माण झाली आहे. दुबई चॉकलेट 2021 साली बुटीक अमिराती चॉकलेट फिक्स या नावांतर्गत लाँच करण्यात आले. मिल्क चॉकलेट, कटैफी पेस्ट्री, पिस्ता क्रिम यापासून दुबई चॉकलेट तयार करण्यात येते. 2023 मध्ये टिकटॉकवर दुबई चॉकलेटवर व्हिडीयो करण्यात आला. हा व्हिडीयो तुफान व्हायरल झाला. आतापर्यंत सुमारे 12 कोटी लोकांनी तरी व्हिडीयो पाहिला असेल. तेव्हापासून या पिस्ता चॉकलेटसाठी जगभरात क्रेझ दिसून येतेय. त्यामुळे पिस्ताची मागणी आणि किंमतही वाढली आहे.

  • एका वर्षात पिस्ताची किंमत 7.65 पाऊंडपेक्षा अधिक झालेय. पिस्ता टंचाईमुळे अस्सल दुबई चॉकलेट तयार करण्यावरही मर्यादा आलेय. दुबई चॉकलेटच्या नावाने डमी चॉकलेट मार्केटमध्ये आणण्याचे प्रकार घडत आहेत. इराण हा पिस्त्याचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. टिकटॉकवर दुबई चॉकलेटचा ट्रेंड आल्यानंतर इराणने 40 टक्के निर्यात केली आहे.

जपानी चहाला मागणी

जपानची ‘माचा टी’ जगभरात ट्रेंडिंगमध्ये आलेय. जगभरात जपानी चहाची मागणी वाढलेय. केवळ स्वादासाठी नव्हे तर आरोग्यासाठी ‘माचा टी’ला जगभरात मोठी मागणी आहे. ही एकप्रकारची ग्रीन टी आहे. चहापत्तीला कुटून तिची पावडर करून ‘माचा टी’ तयार केली जाते. या ग्रीन टी पावडरला प्रचंड मागणी आहे. मागणी तसा पुरवठा करण्यात जपानने हात टेकलेत. जगभरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ‘माचा टी’चा पुरवठा करणे जपानला शक्य होत नाहीय. त्यामुळे कदाचित या चहाची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मालेगाव खटल्याच्या निकालापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांची एका वाक्यात प्रतिक्रिया…निकालाबाबत कोर्टात काय घडले? मालेगाव खटल्याच्या निकालापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांची एका वाक्यात प्रतिक्रिया…निकालाबाबत कोर्टात काय घडले?
मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्बल १७ वर्षांनी गुरूवारी ८ मे रोजी जाहीर होणार होता. यापूर्वी, १९ एप्रिल...
घटस्फोटानंतर 4 वर्षांनी समांथा विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात,नात्याची कबुली? म्हणाली ,’नवीन सुरुवात…’
घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाला स्वप्निल; म्हणाला “तिसऱ्या व्यक्तीला कधीच..”
Operation Sindoor – आणखी अ‍ॅक्शन दिसणार! कारवाईसाठी हवाई दलाला पूर्ण मोकळीक; NSA डोवल अचानक पंतप्रधान मोदींना भेटले
दिल्लीतील अंतराळ संशोधन परिषदेत NASA अनुपस्थित, काय आहे कारण? वाचा सविस्तर
Operation Sindoor Update – ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; सर्वपक्षीय बैठकीनंतर हिंदुस्थानची गर्जना
Big Breaking- रावळपिंडीतील पाक सैन्याच्या मुख्यालयात भीषण स्फोट