निवडणुकीत फक्त 155 मतं मिळवणाऱ्या अभिनेत्याच्या संपत्तीचा खुलासा
अभिनेता एजाज खान गेल्या दोन दशकांपासून टीव्ही आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करतोय. त्याने 40 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहे. अभिनयक्षेत्रात काम केल्यानंतर एजाजने राजकारणातही पाऊल ठेवलंय.
एजाजने 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून नामांकन दाखल केलं होतं. आझाद समाज पार्टीकडून त्याने ही निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याने संपत्तीचा खुलासा केला होता.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात एजाजने त्याची एकूण संपत्ती 41 लाख रुपये असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यापैकी 34 लाख रुपयांची फक्त एक कारच आहे. एजाजचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत, परंतु निवडणुकीत त्याला फक्त 155 मतं मिळाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List