राहुरीत होंडा सिटी कारमधून 10 वासरांची वाहतूक

राहुरीत होंडा सिटी कारमधून 10 वासरांची वाहतूक

कत्तलीसाठी एक महिना वयाची गायीची 10 वासरे निर्दयपणे घेऊन जात असलेली होंडा सिटी मोटार गावकऱयांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. गावकरी आल्याचा सुगावा लागल्याने गायीच्या वासरांची तस्करी करणारे तीन गुन्हेगार दुचाकीवरून पसार झाले.

तालुक्यातील दवणगाव येथे 16 जूनला सायंकाळी ही घटना घडली. दवणगाव येथे एका होंडा सिटी कारमध्ये कत्तल करण्यासाठी गायीची एक
महिन्याची वासरे घेऊन जात असल्याची माहिती मिळताच गावकऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन 10 वासरे आणि कार ताब्यात घेऊन पोलिसांना खबर दिली.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ, बबन राठोड, जाधव, वाघमारे, सूरज गायकवाड, नदीम शेख यांनी घटनास्थळी जाऊन होंडा सिटी कारची पाहणी केली. यामध्ये एक महिना वयाची गायीची 10 वासरे निर्दयीपणे कोंबून ठेवलेली आढळली. पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीची कार व गायीचे वासरे ताब्यात घेतली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीष कुऱहाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालक, तसेच दुचाकीवर फरार झालेल्या इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

चार दिवसांपूर्वी केली होती 25 गायींची सुटका

चार दिवसांपूर्वी राहुरी कृषी विद्यापीठ मुळा उजवा कालवा परिसराजवळील वन विभागाच्या क्षेत्रात काही इसमांनी 100 ते 150 गावरान गायींना बंदिस्त केले होते. या ठिकाणावरून गायींची कत्तलीसाठी विक्री होत असल्याची तक्रार गोरक्षकांनी केल्याने 25 गावरान गायींची सुटका झाली होती. कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी जाताच आरोपी पळून गेले. गोवंश तस्करी, तसेच त्यांची कत्तल हा गंभीर गुन्हा असताना राहुरी तालुक्यात स्थानिक राजकीय पुढाऱयांच्या कार्यकर्त्यांच्या छुप्या पाठिंब्यावर सर्रासपणे गोतस्करी होत आहे. तसेच काही हॉटेल्सवर गोमांस विक्री सुरू असल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी संबंधितांची चौकशीची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रात भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे…; राज ठाकरेंचे शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र महाराष्ट्रात भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे…; राज ठाकरेंचे शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची...
Raja Raghuvanshi Case – घटनेची पुनरावृत्ती सोनमवर पडली भारी; राजा रघुवंशी हत्येत वापरलेले दुसरे हत्यारही जप्त
आलोकनगरात पुन्हा दरोडेखोरांचा धुमाकूळ, दोन घरे फोडली; नागरिकांमध्ये दहशत, महिनाभरापूर्वी टाकलेल्या दरोड्याची पुनरावृत्ती
कसोटी मालिकेत हिंदुस्थानचीच सरशी! माजी धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनचे भाकीत
Crime News – चोरीच्या आरोपांवरून मनोरुग्णाची निर्घृण हत्या, नदीकाठी पुरला मृतदेह
अमेरिकेत राहणाऱ्या मराठी दाम्पत्याने मुलाला टाकलं झेडपीच्या शाळेत, मराठी शिकण्यासाठी घेतला निर्णय
Crime news – भिवंडीत तीन दिवसांत पाच अल्पवयीन मुले बेपत्ता