हर घर मे नल; नल मे नही जल ; 185 कनेक्शन, पण 20 तोट्यांनाच पाणी, जलजीवन मिशन योजनेचा घसा कोरडा

हर घर मे नल; नल मे नही जल ; 185 कनेक्शन, पण 20 तोट्यांनाच पाणी, जलजीवन मिशन योजनेचा घसा कोरडा

हर घर नल से जल.. अशा जाहिराती करून सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे. मात्र ही कामे अनेक ठिकाणी कागदावरच राहिली असून ग्रामीण भागात या योजनेचा घसा अक्षरशः कोरडा पडला आहे. मोखाडा तालुक्यातील कुंडाचा पाडा गावात तब्बल 185 नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र त्यातील केवळ 20 तोट्यांनाच पाणी येत असून महिलांना रणरणत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे सरकारच्या योजनेचे तीनतेराच वाजले आहेत.

मोखाडा तालुक्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे लटकली आहेत. याचा फटका भोवाडी गावच्या हद्दीतील कुंडाचा पाडा येथील नागरिकांना बसत आहे. योजनेतून येथे 185 नळ कनेक्शन देण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ 20 नळजोडण्यांना पाणी येत आहे. त्यामुळे उर्वरित गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

आंदोलनाच्या दणक्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव

जलजीवन मिशन योजनेतील या गोंधळाविरोधात गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. उपअभियंता ललित बोरदे यांनी जोपर्यंत नळयोजनेच्या पूर्ण जोडण्या होत नाहीत तोपर्यंत विहिरीतूनच संपूर्ण गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी संदीप पांघारी, सुनील बांबरे, नवश्या दिघा, लहू पांघरी, बचू दिघा, शांताराम दिघा, कमळू घुमल तसेच भोवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा एल्गार, 5 व 6 मे रोजी काळय़ा फिती लावून काम करणार आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा एल्गार, 5 व 6 मे रोजी काळय़ा फिती लावून काम करणार
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेली राज्यातील सर्व सिव्हील रुग्णालये, मनोरुग्णालये आणि विमा योजना रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांसाठी प्रचंड...
लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी आदिवासींचे पैसे पळवले, पैशांचं सोंग आणता आणता भाऊ, दादा आणि दाढीची दमछाक
भूसंपादनाच्या भरपाईला दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; हायकोर्टाने राज्य सरकार, रेल्वेला बजावले
अनधिकृत होर्डिंग्ज कारवाईबाबत अखेरची संधी; बेकायदा बॅनरविरोधात ठोस पावले उचला हायकोर्टाचे राज्यातील नगर परिषद, पालिकांना आदेश 
अजितदादांचे तो मी नव्हेच… शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नव्हते! कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा अकोला, अमरावती आणि बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे अन्यायकारक समायोजन रोखा, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे निरीक्षक कार्यालयांवर तीव्र आंदोलन
आदिवासी विकास महामंडळाच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार